विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)
आपला बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेनेने (शिंदे गट) पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेने ठाण्यात ७१ जागांवर विजय मिळवला असून, हा आकडा ७५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडे ६७ जागा होत्या, मात्र यावेळी ठाणेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निकालांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “मुंबईत देखील शिवसेनेने (शिंदे गट) मोठी मुसंडी मारली आहे. आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवली, तर काही लोकांनी केवळ भावनेच्या आधारावर मतं मागितली. पण मुंबईकरांनी साडेतीन वर्षांतील आमची कामे आणि रखडलेल्या प्रकल्पांना दिलेली गती पाहून आम्हाला कौल दिला आहे.”
मुंबई आणि ठाण्यासह राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये महायुतीचेच महापौर बसतील. आता केंद्र, राज्य आणि महापालिकेतही महायुतीची सत्ता असल्याने मुंबईच्या विकासाला ‘ट्रिपल इंजिन’चा वेग मिळेल. ‘उबाठा’ने १६० जागा लढवून केवळ ६० जागांवर आघाडी मिळवली आहे, यावरून जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट होते.
Mira Bhayandar Election 2026 : भाजपाची एकहाती सत्ता; 78 जागांवर घवघवीत विजय






