Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोगस दिव्यांग आता मोबाइलच्या रडारवर! प्रवासातही ‘मुंडे इफेक्ट’, बनवेगिरी दिसताच जप्तीसह गुन्हाही नोंदविणार

महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या 'यूडीआयडी' कार्डची मोबाइल अ‍ॅपद्वारे पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी यवतमाळसह सर्व विभागीय नियंत्रकांना पत्र जारी केले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 25, 2026 | 03:12 PM
बोगस दिव्यांग आता मोबाइलच्या रडारवर! प्रवासातही 'मुंडे इफेक्ट', बनवेगिरी दिसताच जप्तीसह गुन्हाही नोंदविणार

बोगस दिव्यांग आता मोबाइलच्या रडारवर! प्रवासातही 'मुंडे इफेक्ट', बनवेगिरी दिसताच जप्तीसह गुन्हाही नोंदविणार

Follow Us
Close
Follow Us:

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे काही जणांनी विविध प्रकारच्या सोयी सवलती लाटल्या आहेत. असे अनेक बनावट दिव्यांग धडधाकट असतानाही महामंडळाच्या बसमध्ये ७५ टक्के तिकिट सवलत घेतात. मात्र आता दिव्यांग कल्याण आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या प्रकारावर आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. त्यांच्या निर्देशानुसार आता महामंडळाच्या यंत्रणेनेही एसटीतील दिव्यांगांवर नजर ठेवणे सुरू केले आहे. बस वाहकाच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये दिव्यांगाचे यूडीआयडी कार्ड खरे की खोटे हे तपासण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बोगस दिव्यांग प्रवासी आढळताच त्यांचे कार्ड जप्त करण्यासोबतच गुन्हाही दाखल केला जाणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

थंडी ओसरल्यानंतर पर्यटन आराखडे सुरू! पहिली पसंती ‘टिपेश्वर’ला, सुन्ना गेटवर होतंय वाघाचे दर्शन

महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या ‘यूडीआयडी’ कार्डची मोबाइल अ‍ॅपद्वारे पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी गुरुवारी (दि. २२) यवतमाळसह सर्व विभागीय नियंत्रकांना पत्र जारी केले आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ तसेच शासनाच्या विविध आदेशांनुसार एसटीमार्फत पात्र दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीचा गैरवापर रोखण्यासाठी पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार वाहतूक महाव्यवस्थापकांनी सर्व विभाग नियंत्रकांना पत्र दिले आहे. या पत्रानुसार एसटी बसेसमध्ये दिव्यांग प्रवाशांच्या ‘यूडीआयडी’ कार्डची मोबाइल अ‍ॅपद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे. दिव्यांगाचे कार्ड वैध आढळल्यास संबंधित दिव्यांग प्रवाशास प्रवास सवलत देण्यात येईल.

मात्र, कार्ड बनावट अथवा अवैध असल्याचे निष्पन्न झाल्यास ते जप्त करून आगारात जमा करण्यात येणार असून, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६च्या कलम ९१ नुसार कायदेशीर कारवाईसह गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. जप्त करण्यात आलेल्या ओळखपत्रांची नोंद आगार व विभागीय स्तरावर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भातील मासिक अहवाल वाहतूक महाव्यवस्थापक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारवाई करताना प्रवाशांच्या तक्रारी उद्भवणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

एसटीतील सर्व वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच विभागीय कार्यालयांतील मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना ‘यूडीआयडी डिपार्टमेंट ऑफ इम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज’ हे मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करून कार्ड तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अ‍ॅपद्वारे यूडीआयडी कार्ड क्रमांक व जन्मतारीख नोंदवून कार्ड वैध असल्याची खातरजमा केली जाणार आहे.

नववर्षात दारूच्या विक्रीत वाढ! ग्राहकांचा कल झुकला बिअर आणि वाईनकडे, जिल्ह्यात सुमारे १ कोटी ९ लाख रुपयांची विक्री

८८ एसटी प्रवासात कोणालाही बनावट दिव्यांग ओळखपत्राद्वारे सवलत घेता येणार नाही. एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकानी यूडीआयडी कार्डची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत, आपणही सर्व आगारांना तसेच तपासणी पथकांना अशी तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत – अमृत कच्छवे, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळ, यवतमाळ.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Bogus divyang now on the mobile radar even during travel munde effect as soon as vanvegiri is seen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Yavatmal
  • yavatmal latest news
  • yavatmal news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.