नववर्षात दारू विक्रीचा उच्चांक! नववर्षाच्या जल्लोषात जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल
नवीन वर्षाच्या अमरावती नागरिकांनी यंदाही मद्यपानाचा मार्ग अवलंबला. वर्षाच्या अखेरच्या दिवसामध्ये आणि नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दारू विक्रीवरून जिल्ह्यातील उत्साह कमी झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिकृत उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, केवळ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या सुरुवातीला जिल्ह्यात सुमारे १ कोटी ९ लाख किमतीची दारू विकली गेली. उत्सव आणि मद्यपान यांचे अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू दुकानांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली, भारतीय दारू, परदेशी मद्य, बिअर आणि वाईन यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली.(फोटो सौजन्य – istock)
देशातील अनेक भागांत थंडीचा कडाका; उत्तर भारतात धुक्याची चादरच, डोंगराळ भागांत बर्फवृष्टी
विशेष म्हणजे, परदेशी दारूच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांचा कल बिअर आणि वाईनकडे झुकत असल्याचेही या आकडेवारीवरून दिसून येते. हा बदलता ट्रेंड भविष्यातील उत्पादन शुल्क धोरण ठरवताना महत्त्वाचा ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. एकीकडे नववर्षाचा जल्लोष आणि कोट्यवधींची अधिकृत विक्री, तर दुसरीकडे अवैध दारूविरोधात कठोर कारवाई हे अमरावती जिल्ह्यातील मद्यवापराचे चित्र केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, सामाजिक व प्रशासकीय पातळीवरही गंभीर चर्चेला कारणीभूत ठरत आहे.
३१ डिसेंबरला शहर व परिसरातील अनेक खाजगी ठिकाणी नववर्षाच्या पाट्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अधिकृत नोंदी पाहता, शहरातील बडनेरा मार्गावरील विरसा या एकाच हॉटलने तात्पुरता पार्टी परवाना घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, भारतीय दारूसाठी २ तर परदेशी दारूसाठी ५ इतक्या नाममात्र शुल्कात दैनिक परवाना उपलब्ध असतानाही, बहुतांश ठिकाणी तो घेतला जात नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात ६०७नागरिकांकडे अखिल भारतीय दारू परवाना आहे. त्यांना देशभरात मद्यपानाची मुभा आहे. याशिवाय, ९८४ नागरिकांकडे वार्षिक दारू परवाने आहेत. हे आकडे जिल्ह्यातील मद्यप्रेमींची संख्या आणि दारू वापराचे प्रमाण स्पष्टपणे दर्शवतात.
एकीकडे कायदेशीर विक्रीत कोट्यवधींची उलाढाल होत असताना, दुसरीकडे अवैध दारू व्यवसायावर लगाम घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोठी मोहीम राबवली. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात १ हजार ५४० ठिकाणी छापे टाकण्यात आले. यापैकी तब्बल ८० टक्के छापे अवैध दारू उत्पादकांच्या ठिकाणी होते. या कारवाईत १ हजार ६६३ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले, तर एकूण १ कोटी ७६ लाख ११ हजार किमतीची दारू जप्त करण्यात आली.
BJP Leader Viral Video: ‘इथे २०–२५ हजारांत मुली मिळतात’; भाजपमंत्र्याच्या पतीचा व्हिडिओ व्हायरल






