Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Compressor explosion : कॉम्प्रेसर फुटून दोन कामगार भाजले, रेमी कंपनीतील दुर्घटना

एमआयडीसीतील रेमी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करताना दोन कामगार भाजल्याची गंभीर घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कामगार भाजले असल्याची माहिती समोर येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 28, 2025 | 06:35 PM
कॉम्प्रेसर फुटून दोन कामगार भाजले, रेमी कंपनीतील दुर्घटना

कॉम्प्रेसर फुटून दोन कामगार भाजले, रेमी कंपनीतील दुर्घटना

Follow Us
Follow Us:
  • रेमी ग्रुप ऑफ कंपनीमध्ये आगीची घटना
  • दोन कामगार भाजल्याची गंभीर घटना घडली
  • ४५ ते ५० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक
बोईसर, सुशांत संखे : बोईसर एमआयडीसीतील रेमी ग्रुप ऑफ कंपनीमध्ये काम करताना दोन कामगार भाजल्याची गंभीर घटना घडली आहे. या दुर्घटनेत अतिक खान आणि वसिम सलमानी हे दोघे ४५ ते ५० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एडवान्स कुलींग बोईसर एजन्सीला कंपनीकडून वातानुकुलीत यंत्रणांची वार्षिक सर्व्हिस करण्याचा ठेका देण्यात आला होता. दुपारी सुमारे ३:४० वाजता हे कामगार सर्व्हिस करत असताना गॅस जास्त प्रमाणात भरल्यामुळे कॉम्प्रेसरचा स्फोट झाला आणि त्यातून दोघे कामगार भाजले. ही माहिती कंपनीचे सुरक्षा अधिकारी बी. पी. सिंग यांनी दिली. अपघातानंतर दोन्ही कामगारांना तात्काळ बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

वातानुकुलीत सर्व्हिस करणाऱ्या कामगारांकडे आवश्यक प्रशिक्षण व अनुभव नसल्यानेच ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. एडवान्स कुलींग बोईसर एजन्सीच्या मालकाचा निष्काळजीपणा समोर येत आहे.

राज्यातील पर्यटकांना हत्तीबेटाचा भरळ; One Day Trip साठी जाणून घ्या कुठे आहे अन् कसे जाल?

याचदरम्यान,वाळूज येथील सुप्रीम सिलिकॉन कंपनीला सोमवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी अचानक आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणात सिलिकॉन व इतर रासायनिक रॉ मटेरियल असल्याने उशिरापर्यंत आगीची धगधग सुरू होती अभिजित सूर्यवंशी यांची वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सुप्रीम सिलिकॉन (एच सेक्टर, प्लॉट क्र.५५) या नावाने कंपनी असून या कंपनीत सिलिकॉनचे उत्पादन घेण्यात येते. सोमवारी १२ ते १५ कामगार काम करत होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास कंपनीत आग लागल्याचे कामगारांना दिसून आले.

साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण

आगीची माहिती मिळताच एमआयडीसीचे दोन बंब गरवारे एक तसेच खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास तीन ते साडे तीन तासांच्या परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कंपनीतील संपूर्ण मशीनरी व सिलिकॉन मटेरियल जळून भस्मसात झाले.

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी 8300 बसेस; 3×2 बसेस सव्वा वर्षांनंतर येणार सेवेत

Web Title: Boisar two workers burned due to compressor explosion in remi company accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 06:35 PM

Topics:  

  • Boisar
  • Fire
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.