Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्…

साहित्य, संस्कृती आणि कलेचा उत्सव असणारा पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २१ डिसेंबरदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य स्वरूपात रंगणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2025 | 03:15 PM
पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्...

पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्...

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार
  • तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं
  • सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष आकर्षणे
पुणे : साहित्य, संस्कृती आणि कलेचा उत्सव असणारा पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २१ डिसेंबरदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य स्वरूपात रंगणार आहे. या ठिकाणी वाचक आणि पुस्तक प्रेमींना तब्बल ८०० बुक स्टॉलला भेट देता येणार आहे आणि विशेष म्हणजे तब्बल ५० लाख पुस्तकं या ठिकाणी पाहता आणि वाचता येणार आहेत. मराठी, हिंदू, इंग्रजी, तमिळ, तेलगू या सारख्या विविध भाषांमधील पुस्तकं याठिकाणी पुस्तक प्रेमींना पाहायला मिळणार आहेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सर्व पुणेकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

९ दिवस होणाऱ्या या महोत्सवात केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे व्याख्यान आयोजित केलं आहे. यासोबतच इस्रो ‘गगनयान’ कार्यक्रमातील अंतराळवीर म्हणून ओळखले जाणारे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे व्याख्यान सुद्धा या महोत्सवात आयोजित केलं आहे. उद्यापासून सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा महोत्सव खुला राहील.

संयोजक राजेश पांडे म्हणाले, “पुणे पुस्तक महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. विविध भाषांमधून उपलब्ध असणारे पुस्तकं पुणेकरांना अनुभवता येईल. बाल महोत्सव, मिलेट महोत्सव, छायाचित्रांचे प्रदर्शन, १०० पेक्षा जास्त फूड स्टॉल यासारखे विविध उपक्रम या महोत्सवात आयोजित केले जाणार आहेत. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते पुणे लिट फेस्ट’चे उद्घाटन होईल. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बानू मुश्ताक, शरणकुमार लिंबाळे, प्रविण दीक्षित, एम. जे. अकबर, सचिन पिळगावकर असे विविध मान्यवर यांचे व्याख्यान याठिकाणी होणार आहे.

या महोत्सवात ‘पुणे लिट फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले तीन दिवस मराठीत साहित्यिक, वैचारिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमधून ४० पेक्षा अधिक प्रज्ञावंतांचे विचार ऐकण्यासोबतच, त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये मराठी साहित्यविषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले त्यात साहित्यिकांच्याच जोडीने प्रशासन, उद्योग, संशोधन, समाजकारण आदी क्षेत्रांमधील नामवंत व्यक्तींच्या साहित्याचे विश्लेषण अनुभवता येणार आहे.

शरणकुमार लिंबाळे, डॉ. वसंत शिंदे, जयंत उमराणीकर, प्रविण दीक्षित, आनंद देशपांडे (पर्सिस्टंट), अविनाश धर्माधिकारी, शेफाली वैद्य यासारखे मराठी साहित्यिक आहेत तसेच हिंदी व इंग्रजी साहित्यविषयक सत्रांमधील अक्षत गुप्ता, आचार्य प्रशांत, बी. एस. नागेश, शाहिद सिद्दिकी, शम्स ताहिर यांचें व्याख्यान आयोजित केले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘गगनयान’ कार्यक्रमातील अंतराळवीर म्हणून ओळखले जाणारे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी जुलै २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट दिली. ही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली. शुक्ला हे अंतराळात जाणाऱ्या राकेश शर्मांनंतरचे दुसरे भारतीय ठरले आहेत, असे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी २१ डिसेंबर रोजी नागरिकांना मिळणार आहे.

गिरिजा ओक सुद्धा या महोत्सवालाउपस्थित राहणार आहे. निळ्या साडीतील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आणि नॅशनल क्रश अशी ओळख जरी त्यांना मिळाली असली, तरी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आणि विशेषतः नाट्यरसिकांमध्ये गिरीजा ओक यांनी त्यांच्या अभिनयामुळे छाप पाडली आहे.

Web Title: Book festival to be organized in pune from tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Animal Health : उन्हामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका; दूध उत्पादन घटण्याची शक्यता
1

Animal Health : उन्हामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका; दूध उत्पादन घटण्याची शक्यता

Pratap Sirnaik: नवीन ऑटो रिक्षांना परवाने नाहीत? प्रताप सरनाईकांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
2

Pratap Sirnaik: नवीन ऑटो रिक्षांना परवाने नाहीत? प्रताप सरनाईकांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

“… ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत”; ‘संभाजी’ कादंबरीबाबत विश्वास पाटलांची कोरेगाव भीमा आयोगासमोर चौकशी
3

“… ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत”; ‘संभाजी’ कादंबरीबाबत विश्वास पाटलांची कोरेगाव भीमा आयोगासमोर चौकशी

Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ
4

Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.