Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत”; ‘संभाजी’ कादंबरीबाबत विश्वास पाटलांची कोरेगाव भीमा आयोगासमोर चौकशी

१७व्या शतकाच्या सुरुवातीच्या सनदांमधून गोविंद महार या नावाचा संदर्भ घेतल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, वकील देशमुख यांनी सनदांमध्ये अशा व्यक्तीचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट केले

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 09, 2026 | 05:34 PM
“… ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत”; ‘संभाजी’ कादंबरीबाबत विश्वास पाटलांची कोरेगाव भीमा आयोगासमोर चौकशी
Follow Us
Follow Us:

विश्वास पाटील हे प्रसिद्ध कादंबरीकार अन् निवृत्त आयएएस अधिकारी
99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे भूषवले होते अध्यक्षपद
विश्वास पाटलांची आयोगासमोर उलटतपासणी

पुणे: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयोगासमोर कादंबरीकार व निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांची उलटतपासणी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “संभाजी” या कादंबरीत अंत्यसंस्काराच्या प्रसंगात गोविंद महार या व्यक्तीचा उल्लेख कोणत्या ऐतिहासिक पुराव्यावर केला आहे, असा सवाल विशेष सरकारी वकील (एस.पी.पी.) शिशिर हीरे यांनी केला.

यावर उत्तर देताना पाटील यांनी सांगितले की, कादंबरीतील संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित पात्रे काल्पनिक असून या घटनेबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. “कादंबरीतील काल्पनिक दुय्यम पात्रे सर्व जाती व समुदायांचे प्रतिनिधित्व करतात. वडू बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्कारावेळी विविध समाज एकत्र आले होते, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यातून केला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

वडू ग्रामपंचायतीचे वकील मंगेश देशमुख यांनी दाखल केलेल्या अर्जानंतर पाटील यांना चौकशीसाठी आयोगासमोर बोलावण्यात आले होते. गोविंद गोपाल महार यांनी अंत्यसंस्कार केल्याचा समज प्रस्थापित करण्यासाठी कादंबरीचा वापर करून समाजांमध्ये द्वेष पसरवला जात असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, “राजकीय किंवा सांप्रदायिक लाभासाठी साहित्याचा वापर करू नये.”

“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?

उलटतपासणीदरम्यान पाटील यांनी सांगितले की, काही घटनांचे चित्रण प्रभावी करण्यासाठी कादंबरीत काल्पनिक पात्रांचा समावेश केला आहे. तसेच  १७व्या शतकाच्या सुरुवातीच्या सनदांमधून गोविंद महार या नावाचा संदर्भ घेतल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, वकील देशमुख यांनी सनदांमध्ये अशा व्यक्तीचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, वडू बुद्रुक हे ऐतिहासिक गाव असून येथे ‘बापूजी आणि पद्मावती शिवले’ यांचे स्मारक आहे. स्थानिक मराठा समाजाच्या मते, १६८९ मध्ये मुघल बादशहा औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर, त्याचे आदेश झुगारून शिवले देशमुख यांनी त्यांच्या अंत्यसंस्कार केले होते. निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय आयोग सध्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या कारणांचा तपास करत आहे.

Marathi Sahitya Sammelan : “तुमच्या समोर असणारा पाटील हा…”; काय म्हणाले Akhil Bhartiya Sahitya संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?

काय म्हणाले संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?

“सध्या काळ वेगळा आहे. निवणुकांचा काळ आहे. देवेंद्रजी तुमची निवडणुकीची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता आहे. शेतकरी आत्महत्या केवळ शासनाचे नव्हे तर साहित्यिकांचे देखील अपयश आहे. शेतकऱ्याना न्याय मिळाला पाहिजे. अण्णाभाऊ साठे याना भारतरत्न मिळाला पाहिजे.”

Web Title: Vishwas patil questioned before koregaon bhima commission regarding sambhaji novel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Maharaj
  • Koregaon Bhima
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.