Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara : यशवंत टाकीच्या पाणीगळतीने नगरपरिषदेचा ठेकेदारावर बडगा मध्यरात्री टाकी ओसंडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय; २५ हजारांचा दंड,

Satara : शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील निष्काळजीपणा अखेर संबंधित कंत्राटदाराच्या अंगलट आला आहे. यशवंत पाणीपुरवठा टाकी मध्यरात्री ओसंडून वाहिल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 08, 2026 | 09:58 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Satara :  या घटनेची गंभीर दखल घेत सातारा नगरपरिषदेने संबंधित पाणीपुरवठा कंत्राटदारावर २५ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. ही रक्कम कंत्राटदाराच्या देयकातून वसूल करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास यशवंत टाकीतून पाणी ओसंडून वाहत असल्याचे निदर्शनास आले. पाणीसाठ्याचे योग्य नियोजन आणि वितरण करताना टाक्यांच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असताना या घटनेमुळे संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाई शहरात साथीच्या रोगांचे सावट, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त

पाणीपुरवठा व्यवस्थापनाच्या करारानुसार टाक्यांची नियमित पाहणी, पाणीपातळीचे नियंत्रण, आवश्यक वेळी पंपिंग बंद करणे तसेच उपकरणांची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. त्यामुळे यशवंत टाकी ओव्हरफ्लो होण्यामागे देखरेखीतील त्रुटी असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

या प्रकाराबाबत संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा खुलासा मागविण्यात आला असून, करारातील अटी-शर्तींच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, निष्काळजीपणाची प्राथमिक दखल घेत २५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दंडाची रक्कम आगामी देयकातून कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देयकातून रक्कम वसूल करणे शक्य नसल्यास करारातील तरतुदीनुसार सुरक्षा ठेव किंवा अनामत रकमेतून ती वसूल केली जाणार आहे. आवश्यक असल्यास कंत्राटदाराकडून थेट रक्कम जमा करून घेण्याची कार्यवाहीही केली जाऊ शकते.

यंत्रणेच्या तपासणीचे आदेश

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व पाणीपुरवठा टाक्यांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः टाक्यांमधील फ्लोट व्हॉल्व्ह, लेव्हल कंट्रोल यंत्रणा, पंपिंग प्रणाली, इनलेट-आउटलेट व्हॉल्व्ह आणि अन्य उपकरणे कार्यरत आहेत की नाही, याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.
टाकीची पाणीपातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचण्यापूर्वी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी संबंधित कर्मचारी आणि कंत्राटदाराच्या प्रतिनिधींची जबाबदारी निश्चित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी; 1894 ठरावांनंतर मतदारयादीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष

पुन्हा प्रकार घडल्यास करार धोक्यात

पाणीपुरवठा व्यवस्थेत पुन्हा निष्काळजीपणा आढळल्यास केवळ दंडावर न थांबता नुकसान भरपाईची वसुली, अतिरिक्त दंड आणि प्रसंगी कंत्राट रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे. संबंधित दंडाची नोंद कंत्राटदाराच्या कामाच्या नस्तीमध्ये करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Breaking news iran ready to halt the war expects trust from the us 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara
  • Satara Municipal Council

संबंधित बातम्या

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…
1

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
3

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.