Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Jalgaon Ganesh Visarjan 2026: जळगावमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यास बंदी असल्याची माहिती सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठकीत पोलिसांनी दिली. डीजे लावणाऱ्या मंडळांना मिरवणुकीदरम्यान तात्काळ रोखले जाणार नसले तरी कालांतराने नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 22, 2026 | 02:20 PM
Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • विसर्जन मिरवणुकीत DJवर बंदी
  • मंडळांना केवळ दोन वाहनांची परवानगी
  • रात्री 12 वाजल्यापासून क्रमांक निश्चिती
Jalgaon Police Warning: विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यास बंदी आहे. जे मंडळ डीजे लावतील, त्यांच्यावर मिरवणुकीत तात्काळ कारवाई करण्यात येणार नाही; परंतु कालांतराने नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. Jalgaon Ganesh Visarjan 2026:

यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, पोलिस निरीक्षक विशाल जैस्वाल, सागर शिंपी, उपायुक्त निर्मला गायकवाड, महापालिका आरोग्य विभागाचे सहायक उपायुक्त समीर बोरोले आदी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष मुंकूद मेटकर, माजी अध्यक्ष सचिन नारळे आदी उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीत महापालिकेचा मानाचा गणपती प्रथम असेल. त्यानंतर पहिल्या दहा मंडळांना विसर्जन क्रमांक दिला जाणार नाही. त्यांना थेट प्रवेश दिला

पहिल्या १० मंडळांना थेट प्रवेश; बैठकीनंतर वाद

विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या जास्त वाहनांना परवानगी देण्यात येणार नाही. केवळ दोनच वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यापेक्षा अधिक वाहने मंडळांना ठेवता येणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या सूचना मांडल्या. सार्वजनिक मंडळाची बैठक शांततेत पार पडली.

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे …

परंतु कार्यकर्ते जात असताना महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक मंडळाचे माजी पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यामुळे थेट एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविला.

रात्री बारा वाजेपासून क्रमांक

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी रात्री बारा वाजेपासून आपला क्रमांक निश्चित करावयाचा आहे. रात्री त्यांनी आपल्या मंडळाचे वाहन रांगेत लावायचे आहे. त्यानुसारच त्यांना क्रमांक देण्यात येईल. मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत दिलेल्या वेळेतच आपली मिरवणूक काढावयाची आहे. मंडळांनी जर उशीर केला तर त्यांना त्यांच्या त्या क्रमांकावरून काढून शेवटच्या नंबरवर काढण्यात येईल.

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

विसर्जन मिरवणुकीत मंडळानी डीजे लावू नये, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. मात्र, तरीही जे मंडळ डीजे लावतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईलच. त्यांना मिरवणुकीत कोणताही मज्जाव करण्यात येणार नाही; परंतु कालांतराने नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे मिरवणुकीत डीजे लावू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.

स्वागत व्यासपीठ मागे सरकवणार

मिरवणुकीत विविध संस्थांतर्फे मंडळाचे स्वागत करण्यात येते. परंतु काही संस्थांचे स्वागत व्यासपीठ पुढे लावण्यात येते. त्यामुळे मिरवणुकीस अडथळा ठरतो. त्यामुळे हे व्यासपीठ मागील बाजूस लावण्यात यावेत, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Jalgaon ganesh visarjan dj ban police warning ganesh mandals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • DJ
  • Jalgaon
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
1

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
2

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त
4

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.