
माहितीनुसार, सिव्हिल लाईन्समधील सीटीओ कार्यालयाच्या मालकीची १७,४२४ चौरस मीटर जमीन विकण्याची योजना आहे. हा भूखंड शहरातील एका प्राइम भागात आहे आणि सरकारने त्याची किंमत ४६२.३५ कोटी ठेवली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा भूखंड प्राइम क्षेत्रात असला तरी, किंमत निश्चित केलेली आहे, ती जास्त आहे. म्हणूनच गत २ वर्षांपासून बोली लावली जात आहे, परंतु कुणीही ती खरेदी इच्छुक नाही. अनेक बांधकाम व्यावसायिक या जमिनीवर लक्ष ठेवून आहेत, परंतु अद्याप कुणीही ती खरेदी करण्याचे धाडस दाखविले नाही.
Delhi Blast News: दिल्ली स्फोटासाठी उमर नबीला कार पुरवणाऱ्याला अटक; महत्त्वाचे खुलासे समोर येणार
भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ची कोराडीमध्ये एक प्रमुख जागा आहे. येथेही ५६,२१६.८८ चौरस मीटर बीएसएनएल जमीन विकण्यासाठी बोली मागविल्या. या जमिनीची राखीव किंमत २९८.२७ कोटी ठेवली.बोली जाहीर होऊन बराच काळ लोटला आहे, पण कुणीही घेणारा आलेला नाही. खाजगी बांधकाम व्यावसायिकांचा अंदाज आहे की, हा दर खूप जास्त आहे. या भूखंडाची किंमत जास्त असल्याने अनेकांची इच्छा असूनही ते खरेदी करू शकत नाही.
काटोलमध्येही विभागाकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. काटोल परिसरातील विभागाच्या १०,१०० चौरस मीटर जमिनीची विक्री करण्यासाठी बोली मागवण्यात आल्या आहेत. या जमिनीची किंमत २२.६८ कोटी इतकी आहे. परंतु येथेही कोणत्याही बोली लागल्या नाहीत. त्यामुळे ती ‘विक्रीसाठी’ यादीत आहे. स्थानिकांचाही अंदाज आहे की, या जमिनीची किंमत खूप जास्त आहे. म्हणूनच लोक निविदेत भाग घेत नाहीत.
लवकरच रहस्य उघडणार! ‘Tumbbad’ दिग्दर्शक Rahi Barve पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मयसभा’ Teaser आउट
तोटा कमी करणे
या जमिनी विकून सरकार अतिरिक्त महसूल मिळवू इच्छिते. यामुळे सरकारला अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि सरकारी कंपन्यांचे नुकसान कमी होईल, बीएसएनएलने जास्तीची जमीन भाड्याने देऊन किवा विकून तोटा कमी करण्यात लक्षणीय यश मिळविले. यामुळे अलीकडच्या काळात सरकारी कंपन्यांचे नुकसानही कमी झाले.
किंमत आगाऊ द्यावी लागेल
तज्ज्ञांच्या मते, किंमत जास्त नाही. किमत रेडी-रेकनिग दराने निश्चित केली आहे, परंतु येथे प्रश्न असा आहे की, खरेदीदारास करार पूर्ण करण्यासाठी आगाऊ पैसे द्यावे लागतील, बहुतेक बिल्डर्सना हे मान्य नाही. जमीन प्राइम असूनही विकली जात नाही. सरकारला बराच काळ वाट पाहावी लागत आहे.
भाड्याने घेतलेल्या अनेक मालमत्ता
त्यांच्या बीएसएनएलने अनेक मालमत्ता भाड्याने दिल्या. यामुळे महसुलात लक्षणीय वाढ झाली. नागपुरात, मोठ्या मालमत्ता आयकर विभाग, एचपीसीएल, जीएसटी, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना भाड्याने देण्यात आल्या. यामुळे बीएसएनएलला दरमहा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. काही इतर मालमत्ता भाड्याने देण्याचाही विचार केला जात आहे.
या जमिनीची होणार विक्री व किंमत
सीटीओ १७,४२४ चौरस मीटर ४६२.३५ कोटी
कोराडी ५६,२१६.८८ चौरस मीटर २९८.२७ कोटी
काटोल १०,१०० चौरस मीटर २२.६८ कोटी