(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘तुंबाड’ चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्या नव्या चित्रपट ‘मयसभा’चा फर्स्ट मोशन टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक बर्वे जवळजवळ एक दशक प्रयोग, विकास आणि पुनर्निर्माण करून या चित्रपटावर काम करत आहेत. ‘मयसभा’ हा तुंबाडसारखा नाही आणि तुम्ही यापूर्वी पाहिलेल्या इतर कोणत्याही चित्रपटासारखा देखील नाही. हा चित्रपट भारतीय चित्रपट क्षेत्रात एक नवीन अध्याय उलगडणार आहे.
मयसभा चित्रपटात, प्रेक्षक आणि चार व्यक्तिरेखा एकत्र मिळून प्रवास सुरू करतात- दोघांसाठी खजिन्याचा शोध एकाच क्षणी सुरू होतो. पण चित्रपट जसजसा पुढे जातो, तसा या पात्रांना येणारा अनुभव आणि प्रेक्षकांना येणारा अनुभव यामध्ये फरक पडू लागतो. यामध्ये पात्रांना जो धक्का बसतो, तो त्यांना कथानकात जे सापडते, त्यामधून आलेला असतो, तर प्रेक्षक मात्र सत्य जाणून अवाक होतात, अशी सत्ये जी या पात्रांना दिसत नाहीत. पण तरीही चित्रपट प्रेक्षकांना अंतर देत नाही; चित्रपट ही खात्री करतो की प्रेक्षकांची या व्यक्तिरेखांशी असलेली भावनिक समरसता कमी होणार नाही.
आणि कदाचित सगळ्यात वेगळी आणि थोडी धोक्याची बाब तर क्लायमॅक्समध्येच आहे. येथे बर्वे पारंपरिक थरारपटांशी संबंधित अशा जवळपास सर्वच नियमांना फाटा देतात आणि एक संपूर्ण वेगळा मार्ग निवडतात.मयसभा हा दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा, तुंबाडच्या यशस्वी पदर्पणानंतरचा अत्यंत बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. अत्यंत प्रभावी वातावरण निर्मितीबद्दल ओळखल्या जाणाऱ्या बर्वे यांनी पुन्हा एकदा मिथक, रहस्य आणि मानसिक गहनता असलेला विषय निवडला आहे- आणि त्याभोवती तत्वज्ञान, तणाव आणि अनेक तपाशीलांनी समृद्ध असे एक दृश्यमान विश्व विणले आहे. त्यांची खास शैली आता अधिकच धारदार, गडद आणि वेधक झालेली दिसेल.
मयसभा प्रेक्षकांना एका अशा प्रवासाला घेऊन जाते, जेथे लपलेली सत्ये आणि शक्ती संरचना प्रथम दर्शनी वाटतात, त्यापेक्षा खूप जास्त भयावह आहेत. हा चित्रपट अशा एका प्रांतात धाडसी पाऊल टाकतो, जेथे प्रतिकात्मकता आणि रहस्य एक होतात आणि जेथे संवादांपेक्षा शांतता बोलकी होते.
‘कंडोम खरेदी करताना कचरतात…’ नॅशनल शोमध्ये हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा? VIDEO VIRAL
निर्माते गिरीश पटेल आणि अंकूर जे सिंह यांच्यासह झिरकॉन फिल्म्सद्वारा निर्मित आणि शामराव भगवान यादव, चंदा शामराव यादव, केवल हांडा आणि मनीष हांडा द्वारा सह-निर्मित आहे.आशिष निनगुरकर यांनी क्रिएटीव्ह कन्सल्टंट म्हणून जबाबदारी निभावली आहे. ‘मयसभा’ आगामी वर्षातील सर्वाधिक वेधक आणि रहस्यमय सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट ठरला तर नवल नाही. पिकल एंटरटेनमेंट या चित्रपटाचे प्रेझेन्टेर असून झियुस फिल्मच्या साथीने देश आणि विदेशात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.






