दिल्ली स्फोटासाठी उमर नबीला कार पुरवणाऱ्याला अटक; महत्त्वाचे खुलासे
लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने पोलिसांसह सर्व तपास व गुप्तचर यंत्रणेला धक्का बसला होता. घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका संशयास्पद पोस्टरची चौकशी सुरू केली. पुढील तपासात धागेदोरे फरिदाबादपर्यंत पोहोचले आणि तिथे नव्या ‘व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल’चा पर्दाफाश झाला.
“मी राज्यपालपदाचा किंवा राज्यसभेत….”; माजी CJI राजकारणात येणार? पहा काय म्हणाले भूषण गवई
फरिदाबादमध्ये तपास पथकाला तब्बल ३,००० किलो स्फोटक सामग्री आढळून आली, ज्यामुळे दहशतवादी संघटनांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. प्राथमिक तपासानुसार, लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोट हा ठरवून घडवून आणल्याचा संशय आहे. या भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तपास सुरू असून एनआयए आणखी आरोपींचा शोध घेत आहे.
NIA कडून उमरच्या सहकाऱ्याला अटक
दिल्लीत झालेल्यया बॉम्बस्फोटाच्या काही काळापूर्वी दहशतवादी उमर नबीला आश्रय दिल्याच्या आणि मदत केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) फरिदाबादमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. संबंधित व्यक्तीचे नाव शोएब असे असून तो फरिदाबाद येथील धौज येथील रहिवासी आहे.
आतापर्यंतच्या तपासानुसार, शोएबने १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार बॉम्बस्फोटापूर्वी उमरला आश्रय आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता. यात अनेक लोक मृत्युमुखी पडले, तर अनेकजण जखमी झाले. एनआयएने यापूर्वी उमरच्या सहा साथीदारांना केस क्रमांक आरसी-२१/२०२५/एनआयए/डीएलआय मध्ये अटक केली आहे.
आत्मघातकी हल्ल्यामागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी एजन्सी अनेक धाग्यांवर काम करत आहे. दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात, तपास एजन्सी विविध राज्यांमधील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्यात सहभागी असलेल्या उर्वरित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी शोध घेत आहे.
दिल्लीतील लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए वेगाने तपास सुरू आहे. एनआयएने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, या भीषण स्फोटामागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी सर्वांगीण चौकशी सुरू असून लवकरच महत्त्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. कटाची सखोल माहिती मिळवण्यासाठी तपास पथक शोएबची विस्तृत चौकशी करणार आहे.
फरिदाबादहून अटक केलेल्या शोएबच्या अटकेमुळे तपासाला निर्णायक वळण मिळाले आहे. शोएबने आत्मघाती हल्लेखोर उमर नबीला लॉजिस्टिक मदत दिल्याचा आरोप असून, दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणातील तो सातवा आरोपी ठरला आहे. तपास यंत्रणेनुसार, शोएबने उमरला एक कार उपलब्ध करून दिली होती.
याशिवाय, शोएब हा उमरला लाल किल्ल्याजवळ घेऊन जाणारा आणि फरिदाबादमधील ‘दहशतवादी मॉड्यूल’ची बैठक आयोजित करणारा व्यक्ती असल्याचा तपासात प्राथमिक निष्कर्ष आहे. अटक केलेल्या शोएबला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार असून, एनआयए त्याच्या रिमांडची मागणी करणार आहे. या चौकशीमुळे स्फोटकटातील आणखी दुवे व सूत्रे समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






