Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : भादोला वन बीटमध्ये अवैध मुरुमाचे उत्खनन! २ ट्रॅक्टर, १ जेसीबी जप्त; वनविभागाची कारवाई

बुलढाणा वनविभागाने भादोला वन बीटमधील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात मोठी कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. या कारवाईत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एक जेसीबीसह सुमारे १९.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 05, 2026 | 08:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

वनजमिनीत सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाविरोधात बुलढाणा वनविभागाने मोठी कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. भादोला वन बीटमधील कक्ष क्रमांक ५२३ मध्ये अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि एक जेसीबी जप्त करण्यात आली असून, जप्त वाहनांसह एकूण १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजासाठी आठ नव्या योजना, ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळणार

वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विभागीय वन अधिकारी जमीर शेख यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी तपास मोहीम हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला. या तपासादरम्यान महेश भीमराव जाधव (वय ४०), योगेश वसंतराव एकडे (वय ४१, रा. भादोला) आणि विजय रामा इटकर (वय ३१, रा. पिंपरखेड) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत वनजमिनीतून मुरूमाचे उत्खनन करून त्याचा वापर विविध कामांसाठी केल्याचे समोर आले.

तपासादरम्यान वन अधिकाऱ्यांनी संबंधित गावात जाऊन पाहणी केली असता नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या साईड पट्ट्यांसाठी वनजमिनीतून अवैधरित्या मुरूम काढण्यात आल्याचे उघड झाले. वनक्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीचा विनापरवाना वापर करून गौण खनिजाची वाहतूक करण्यात आल्याचेही निदर्शनास आले. यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे आणि वनक्षेत्रपाल सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक नितेश गवई, समाधान झोटे, गजानन शिंदे, गजानन पोटे, विक्रम राऊत, बाळासाहेब घुले तसेच वनमजूर रवींद्र तायडे, दीपक सोनुने, पवन मुळे, अमोल चव्हाण आणि प्रवीण सोनवणे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

आषाढीपूर्वी विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन! ‘स्टोन पावडर’ तंत्रज्ञानाचा होणार वापर; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची माहिती

वनजमिनीतून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. या कारवाईमुळे वनक्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Buldhana news illegal murrum excavation in bhadola forest beat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: दिव्यांगांना थकीत मासिक मानधन लवकरच मिळणार; आ. भावना गवळी यांची जनता दरबारात माहिती
1

Washim News: दिव्यांगांना थकीत मासिक मानधन लवकरच मिळणार; आ. भावना गवळी यांची जनता दरबारात माहिती

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड
2

Buldhana News: खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, महिनाभरापासून पावसाची दडी; तुषार सिंचनावर पीक जगवण्याची धडपड

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना
3

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी
4

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.