
Washim Illegal liquor seized:
वाशिम: तालुक्यात बनावट देशी आणि विदेशी दारूची अवैध वाहतूक व साठवणूक होत असल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. अडोळी ते कुंभारखेड रस्ता तसेच टो (ता. जि. वाशिम) शिवारातील शेतात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी-विदेशी दारूच्या २० पेट्यांसह एकूण २ लाख ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींना प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी (पीसीआर) मंजूर केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, अमरावती विभागाचे विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर आणि वाशिमच्या प्रभारी अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक एम. के. उईके, एम. एस. जाधव, दुय्यम निरीक्षक आर. पी. मनवर यांच्यासह निवृत्ती तिडके, नितीन चिपडे, स्वप्नील लांडे, विष्णू मस्के, बाळू वाघमारे, गोपाल इंगळे, गणेश नानोटे, निकेश घुले, वैष्णवी सारघोडे आणि वाहनचालक गणेश सपकाळ यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक मधुकर उईके करीत आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी भरारी पथकाने ही तपासणी मोहीम राबवली. यादरम्यान १८० मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ३२९ बाटल्या, इम्पीरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या १३८ बनावट सिलबंद बाटल्या तसेच बनावट देशी दारू भिंगरी संत्राच्या ९० मिली क्षमतेच्या हजार बाटल्यांचा साठा मिळून आला. या प्रकरणी वैभव बबन काकडे (२७), अमोल प्रल्हाद काकडे (२६) आणि रवी माणिक काकडे (३१. सर्व रा. टो, ता. जि. वाशिम यांना अटक करण्यात आली.
Buldhana: ‘वनतारा’ फुलणार बुलढाण्याच्या मातीतही, मुक्या जीवांसाठी खामगावची लेक थेट अंबानींच्या दारी