Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद, पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकाची धडक कारवाई

Chikhli Crime Illegal Pistol Seized: चिखली शहरात अवैध पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीन जप्त करून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 24, 2026 | 06:05 PM
Chikhli Crime Illegal Pistol Seized

Chikhli Crime Illegal Pistol Seized

Follow Us
Follow Us:
  • अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद
  • पिस्तूल व मॅगझीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त
  • डीबी पथकाची धडक कारवाई
बुलढाणा: शहरात अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर चिखली पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांच्या डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व मॅगझीन आढळून आले. पोलिसांनी सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे पिस्तुल व मॅगझीन जप्त केले असून, या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhana News : कचरा टाकणाऱ्यांवर आता १ हजारांचा दंड; मोताळा कचरा डेपो स्थलांतरित होणार, न.प.च्या बैठकीत निर्णय

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिखली पोलिस स्टेशनचे डी. बी. पथक पोलिस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त घालत होते. यावेळी पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू होती. दरम्यान, एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाकडे अवैध अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चिखली शहरातील संभाजीनगर परिसरातील गोपाल किराणा दुकानासमोर सापळा रचला. काही वेळाने माहितीतील संशयित तरुण पायी जाताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केलीअसता त्याने आपले नाव ईश्वर प्रकाश धनवटे (२५, रा. गौरक्षणवाडी, चिखली) असे सांगितले.

पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेच्या उजव्या बाजूला देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पिस्तूलसोबत मॅगझीनही मिळूनआले. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली चिखली – पोलिस स्टेशनच्या डी. बी. पथकाने ही कारवाई यशस्वी केली. कारवाईत पोहेकाँ – अमोल गवई, अजय इटाबा, प्रशांत धंदर, – ज्ञानेश्वर शिंदे, राहुल पायघन, नीलेश – सावळे, मपोहेकाँ ललिता खरात आणि मपोका रुपाली उगले यांनी सहभाग घेतला.

पिस्तुलाच्या हँडलवर गोल्डन स्टार

जप्त करण्यात आलेले पिस्तूल देशी बनावटीचे असून, त्याच्या हँडलवर काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप आहे. या ग्रीपच्या दोन्ही बाजूंवर गोल्डन रंगाचा पंचकोनी स्टार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिस्तूल व मॅगझीनची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले. अवैध अग्निशस्त्र बाळगून फिरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेला आणखी बळ मिळाले.

भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा

अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ अन्वये चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकों अमोल गवई करीत आहेत. जप्त केलेल्या शस्त्राचा वापर यापूर्वीच्या कोणत्या गुन्ह्यात झाला आहे का, तसेच आरोपीकडे है पिस्तूल कोठून आले, याबाबतही तपास केला जाण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून अवैध शस्त्रांचा वापर होऊ नये, यासाठी चिखली पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी आणि रात्रीची गस्त अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येत आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणा-यांमध्ये पोलिसांचा धाक न निर्माण झाला असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

कोळसा प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला? मुख्यमंत्र्यांकडून दखल; केंद्राकडे फेरविचाराचा प्रस्ताव सादर

Web Title: Chikhli crime illegal pistol seized buldhana police action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • buldhana news
  • crime news
  • illegal

संबंधित बातम्या

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
1

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला,  बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता
2

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
3

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?
4

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.