Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

Buldhana Dam Water Level: बुलढाणा जिल्ह्यातील ५२ प्रकल्पांमधील जलसाठा अवघ्या १० दिवसांत ५८.५२ टक्क्यांवरून ५५.४२ टक्क्यांपर्यंत घसरल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 10, 2026 | 06:18 PM
Buldhana Water Storage

Buldhana Water Storage

Follow Us
Follow Us:
  • बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट
  • १० दिवसांत घटला जलसाठा
  • पाणी नियोजनाचे आव्हान

खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ५२ प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याची टक्केवारी २८ सप्टेंबर रोजी ५८.५२ टक्के होती. ती गुरुवारी ५५.४२ टक्क्यांवर आली. अवध्या १० दिवसात जलसाठ्यात सुमारे ३ टक्क्यांची घट झाल्याने पाण्याच्या नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला.

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने जलसाठ्‌यात पुरेशी वाढ होऊ शकली नाही. त्यातच गेल्या महिनाभरापासून उन्हाची तीव्रता वाढत असल्याने प्रकल्पांमधील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. अद्याप उन्हाळ्याला सुरुवात व्हायची असताना जलसाठ्यात घट होत असल्याने आगामी महिन्यांत पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागू शकते. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतानाही परतीच्या पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नाही. ग्रामीण भागातील विहिरी आणि हातपंपांच्या पाणीपातळीवरही होत आहे.

खडकपूर्णातील जलसाठा चिंताजनक

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी खडकपूर्णा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा २८ सप्टेंबर रोजी ५.६० टक्के होता. ८ ऑक्टोबर रोजी तो केवळ १.७५ टक्क्यांवर आला.म्हणजेच दहा दिवसांत या प्रकल्पाच्या जलसाठ्यात ३.८५ टक्क्यांची घट झाली आहे. कोराडी प्रकल्पातही ५.०२ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. नळगंगा, पेनटाकळी, ज्ञानगंगा, मन आणि तोरणा यांसह अन्य प्रकल्पांमधील जलसाठ्यातही घट झाली.

खामगाव पाटबंधारे विभागाचे, उपविभागीय अधिकारी, लोकेश बॉबटकार म्हणाले की, दा पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने प्रकल्पांमधील जलसाठ्यावर परिणाम झाला, उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचा वापर आणि आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी. पावसाची स्थिती आणि प्रकल्पामधील जलसाठ्याचा नियमित आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे.

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

Web Title: Buldhana dam water level water shortage khadakpurna project pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • buldhana news
  • Dam Water Level
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार
1

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

बुलढाण्यात वर्षभरात  ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम
2

बुलढाण्यात वर्षभरात ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन
3

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न
4

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.