Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’! घरोघरी कचऱ्याचे ढीग; पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त

Karanja Garbage Issue: कारंजा नगर परिषद हद्दीत नाल्यांची साफसफाई, कचरा संकलन आणि घंटागाड्यांच्या तुटवड्यामुळे स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील या दयनीय परिस्थितीवर संतप्त नागरिकांनी 'घंटागाड्यांची उलंगवाडी' झाल्याची टीका करत नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 07, 2026 | 06:28 PM
Buldhana News: कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’! घरोघरी कचऱ्याचे ढीग; पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त
Follow Us
Follow Us:
  • कारंजात घंटागाड्यांची ‘उलंगवाडी’
  • घरोघरी कचऱ्याचे ढीग
  • पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नागरिक संतप्त
कारंजा: कारंजा नगर परिषद अंतर्गत शहरात सर्वत्र तुडुंब भरून साचलेल्या नाल्या, घंटागाड्यांच्या तुटवड्‌यामुळे घरोघरी साचलेला कचऱ्याचा ढीग त्यामुळे ढासळलेली स्वच्छता व्यवस्था या व्यवस्थेमुळे या ऐतिहासिक शहरात घंटागाड्यांची झालेली ‘उलंगवाडी’ याची चर्चा नागरिकांमध्ये होत असताना दिसत आहे. ही उलंगवाडी नेमकी नगर परिषदेची की घंटागाडी व्यवस्थेची? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. ‘उलंगवाडी’ हा शब्द सामान्यतः खरीप व रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतात काहीही शिल्लक राहत नाही, त्या अवस्थेसाठी वापरला जातो. मात्र, कारंजा शहरातील नागरिक आता हाच शब्द शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या दयनीय अवस्थेसाठी वापरत आहेत.

अतिक्रमण हटाव मोहिमेला वाशिम शहरात सुरुवात; पहिल्याच दिवशी अनधिकृत बांधकामांवर जेसीबी

नगरपरिषदेची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असलेली स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे चित्र दिसत आहे. घराघरातून कचरा संकलित करून डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचविणाऱ्या घंटागाड्यांची अवस्था दुर्लक्षित झाली. कारंजा नगर पालिका अंतर्गत फक्त १४ घंटागाडी कार्यरत आहेत. त्यामध्येसुद्धा काही नेहमी नादुरुस्त असतात यामुळे फक्त १० घंटागाड्या ह्या कार्यरत आहेत. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रात वाढीव हद्दीसह एकूण अंदाजे २२ हजार ३० हजार प्लस घरे (मालमत्ता) आहेत. पालिका नियमानुसार एकूण १२०० ते १५०० घरामागे १ घंटागाडी अपेक्षित असून, त्यानुसार एकूण २० घंटागाडीची आवश्यकता असल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असता सध्या १० ते १२ घंटागाडी उपलब्ध आहे.

या खेरीज नगरपालिकेतील आरोग्य विभागाकडून अधिक २० घंटागाडीची मंजुरीकरिता प्रस्ताव दाखल केला असल्याची माहिती आहे. शहराच्या विकासाची चाके इतर क्षेत्रांत वेगाने फिरत असताना, स्वच्छतेच्या मुलभूत व्यवस्थेचे चाक नेमके कुठे अडखळले आहे, याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे.

नागरिकांना स्वतः लावावी लागते विल्हेवाट

शहरातील अनेक भागांत घंटागाड्या नियमित येत नसल्याने नागरिकांना स्वतःच कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागत आहे. कोणी चौकात कचरा टाकत आहे, तर काही सुजाण नागरिक दुचाकीवर पोती किंवा पिशव्यांमध्ये कचरा भरून शहराबाहेर नेऊन टाकत आहेत, तर कुणी जवळच्या नालीतच कचरा ओतून देत आहे. परिणामी, चौका-चौकातील कचऱ्याच्या ढिगांवरील घोंघावणाऱ्या माशा, त्यात चारा शोधणारी भटकी जनावरे आणि दुर्गंधीमुळे त्रस्त नागरिक, असे विदारक चित्र शहरात पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको.

Buldhana News: समृद्धीवरील अपघातात एक ठार, क्लीनर किरकोळ जखमी; ट्रकची समोरील वाहनाला धडक

Web Title: Karanja garbage crisis ghanta gadi cleanliness failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • buldhana news
  • Garbage Issue
  • Karanja City

संबंधित बातम्या

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
1

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
3

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त
4

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.