Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष

Karanja Farmers Protest: कारंजा येथे शेतकरी एल्गार समितीतर्फे डॉ. पंकज काटोले यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 04, 2026 | 08:36 PM
Karanja Farmers Protest

Karanja Farmers Protest

Follow Us
Follow Us:
  • कारंजात शेतकऱ्यांचा आक्रोश
  • शेतकरी उतरले रस्त्यावर एल्गार
  • समितीचा शासनाला इशारा
कारंजा: दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी शहरात शेतकरी एल्गार समितीतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, कर्जाचा बोजा कमी व्हावा, वीजबिल माफ करावे तसेच पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती

शेतकरी एल्गार समितीचे मार्गदर्शक डॉ. पंकज काटोले यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. झाशी राणी चौक, बायपास येथून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. दुष्काळामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगामातील पिकांनी अपेक्षित उत्पादन न दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस आर्थिक मदत द्यावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

या मोर्चातील प्रमुख मागणी म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. त्याचबरोबर शेतमजूर आणि इतर कामगारांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बँका आणि सूक्ष्म वित्त संस्थांकडून घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणीही यावेळी पुढे करण्यात आली.

या मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर, विष्णुपंत भुतेकर, दामू अण्णा इंगोले, श्रीधर पाटील, पंकज काटोले, भारत भगत व राजूभाऊ अवताडे यांच्यासह इतर प्रमुख वक्ते उपस्थित होते.

प्रतिव्यक्ती १० किलो धान्याची मागणी

दुष्काळाचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून शेतमजूर, छोटे व्यावसायिक आणि रोजदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे एपीएल, बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती १० किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. कोरडा दुष्काळ संपेपर्यंत शेतकरी, शेतमजूर आणि इतर कामगारांची घरगुती वीजबिले पूर्णपणे माफ करावीत, अशीही मागणी आंदोलकांनी केली.

कर्जावरील व्याज माफ करा

शेतीकामासाठी तसेच वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणि इतर वाहने खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कर्जाचे हप्ते फेडण्याचा ताण आहे. त्यामुळे ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या कर्जावरील व्याज एक वर्षांसाठी माफ करून कर्जाचे हप्ते स्थगित करावेत, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांसाठी चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणीही मोर्चातून करण्यात आली.

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या प्रश्नांना एकत्रितपणे वाचा फोडण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शासनाने दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांची गांभीयनि दखल घेऊन तातडीने मदतीचे निर्णय घ्यावेत, या प्रमुख मागणीचा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.

Khamgaon Accident: कार अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहनात आढळला २६ किलो गांजा; टेंभुर्णा येथे ट्रकने दिली धडक

Web Title: Karanja farmers elgar samiti protest over drought relief demands pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • buldhana news
  • Farmer Protest
  • Karanja City

संबंधित बातम्या

Satara News : महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला; ३० तासांपासून हजारो नागरिक रस्त्यावर अडकले
1

Satara News : महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला; ३० तासांपासून हजारो नागरिक रस्त्यावर अडकले

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती
2

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती

Buldhana: सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात; आता करडी पिकाच्या लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल
3

Buldhana: सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात; आता करडी पिकाच्या लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

Buldhana: दुष्काळात अळीचा घाला! तुरीच्या शेंगा पोखरल्या, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला
4

Buldhana: दुष्काळात अळीचा घाला! तुरीच्या शेंगा पोखरल्या, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.