Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer News: रब्बी हंगाम पीकविम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत; गहू, हरभरा, कांदा पिकाचा समावेश, कृषी विभागाचे आवाहन

Buldhana Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2026: बुलढाणा जिल्ह्यात खरीप २०२६ आणि रब्बी २०२६-२७ हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, गहू, हरभरा, रब्बी कांदा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 05, 2026 | 08:15 PM
Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2026:

Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2026:

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
  • गहू, हरभरा, कांदा पीकविम्याची मुदत जाहीर
  • शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची महत्त्वाची सूचना
बुलढाणा: नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान आणि विविध कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे. तसेच त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित रहावे, यासाठी राज्य शासनामार्फत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप २०२६ आणि रब्बी हंगाम २०२६-२७ या एक वर्षाच्या कालावधीसाठी ही योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी लागू करण्यात आली. रब्बी हंगामात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचा विमा उतरवावा, असे कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी आवाहन केले.

IND vs PAK: भारताची विजयी गर्जना! SAFF चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला लोळवलं; सुहेल भट्ट ठरला विजयाचा हिरो

रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा आणि उन्हाळी भुईमूग या चार पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. अधिसूचित महसूल मंडळ अथवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा या पिकांसाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२६ आहे. तर उन्हाळी भुईमूग पिकासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. योजनेसाठीचे प्रधानमंत्री पीक विमा पोर्टल करण्यात आले.

कार्यान्वित कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी स्वरूपात कळविणे बंधनकारक आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत विमा संरक्षण महत्त्वाचे

अल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, पिकांचे संभाव्य नुकसान आणि त्यातून उद्भवणारे आर्थिक संकट टाळण्यासाठी पीक विमा संरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता वेळेत नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स

बुलढाणा जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर विमा हप्ता गहू (बागायत) पिकासाठी ११२ रुपये ५० पैसे, हरभरा पिकासाठी १८० रुपये, तर रब्बी कांदा पिकासाठी ४ हजार ७५० रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. उन्हाळी भुईमुगासाठी दिलेल्या माहितीत विमा हप्त्याचा दर नमूद नाही.

IPL 2027 आधी CSK-SRH चा गेमप्लॅन? ‘या’ चार खेळाडूंची ट्रेड डील फिक्स; कोणाचा पत्ता कट?

💡

Frequently Asked Questions

  • Que: रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये कोणत्या पिकांचा पीक विमा उतरवता येणार आहे?

    Ans: गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा आणि उन्हाळी भुईमूग या चार पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे.

  • Que: गहू, हरभरा आणि कांदा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची अंतिम मुदत काय ?

    Ans: रब्बी पिकांसाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२६ आहे.

  • Que: उन्हाळी भुईमूग पिकासाठी पीक विमा अर्ज कधीपर्यंत करता येणार?

    Ans: उन्हाळी भुईमूग पिकासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत पीक विम्यासाठी नोंदणी करता येणार आहे.

Web Title: Buldhana rabi crop insurance pm fasal bima yojana 2026 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers
  • PM Kisan Yojana

संबंधित बातम्या

Washim: तुरीच्या फुलांवर काळ्या अळीचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च
1

Washim: तुरीच्या फुलांवर काळ्या अळीचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च

Buldhana: दुष्काळ निवारणासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे निर्देश
2

Buldhana: दुष्काळ निवारणासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे निर्देश

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष
3

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती
4

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.