Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: खरीप गेले, रब्बीची आशाही मावळली! सोयाबीन, तुरीनंतर आता हळदीचे पीकही संकटात; पाण्याअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

Washim Shirpur Turmeric Crop Damage: कमी पावसामुळे शिरपूर परिसरात सोयाबीन आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उरलेली आशा असलेले हळद पीकही पाण्याअभावी संकटात सापडले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 11, 2026 | 03:35 PM
Shirpur Turmeric Crop Damage

Shirpur Turmeric Crop Damage

Follow Us
Follow Us:
  • शिरपूरमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती
  • खरीप उद्ध्वस्त, रब्बीची पेरणी रखडली
  • हळद उत्पादक शेतकरी संकटात
शिरपूर जैन: यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून, तूर पीक जवळपास हातचे गेले आहे. वर्षभराचे आर्थिक गणित ज्या हळद पिकावर अवलंबून असते, ते पोकही सध्या पाण्याअभावी संकटात सापडले आहे. त्यातच रब्बी हंगामातील पिकांची पेरणीही पाण्याअभावी होऊ शकली नाही. त्यामुळे शिरपूर व परिसरातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. (Washim News)

एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर

शिरपूर आणि परिसरात हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. खरीप हंगामात सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांसारखी पिके घेतली जातात. त्यासोबतच हळद हे मसाला वर्गीय पीकही घेतले जाते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली.

काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनचे पीकही आले नाही. तुरीच्या पिकालाही मोठा फटका बसला असून, उत्पादनाची आशा मावळली आहे. आता शेतकऱ्यांची भिस्त हळद पिकावर होती. मात्र, पाण्याअभावी हे पीकही अडचणीत आले आहे. पिकाला आवश्यक तेवढे पाणी मिळत नसल्याने वाढ खुंटण्याची भीती आहे. उर्वरित हंगामात पाण्याची उपलब्धता कायम राहील की नाही, याचीही शेतकऱ्यांना खात्री नाही. त्यामुळे हमखास उत्पन्न देणारे मानले जाणारे हळद पीकही यंदा अपेक्षित आर्थिक आधार देईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाच्या खंडाने शेतकरी हतबल

दुसरीकडे पाण्याची उपलब्धता नसल्याने रब्बी हंगामातील पिकाची लागवड आणि पेरणीही होऊ शकलेली नाही, त्यामुळे आगामी हंगामातून उत्पन्न मिळण्याची आशाही धूसर झाली आहे. खरीप पिकांचे नुकसान, हळदीवरील संकट आणि रब्बी हंगामाची रखडलेली पेरणी अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. कमी पावसाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे, त्यामुळे यंदाच्या पावसाच्या तुटवड्याने शिरपूर परिसरातील शेतीचे अर्थकारणच कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Bus Driver Attacked : “हाता पाया पडूनही गुंड थांबले नाहीत!” चाकणमध्ये भररस्त्यात एसटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिरपूरमध्ये कोणत्या पिकांचे नुकसान झाले आहे?

    Ans: सोयाबीन आणि तूर पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आता हळद पिकावरही संकट आहे.

  • Que: शिरपूरमधील हळद पिकाला कोणती समस्या भेडसावत आहे?

    Ans: पाण्याची कमतरता असल्याने हळद पिकाची वाढ खुंटण्याची भीती आहे.

  • Que: शिरपूर परिसरात रब्बी हंगामाची पेरणी का रखडली?

    Ans: पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे रब्बी पिकांची पेरणी होऊ शकलेली नाही.

Web Title: Washim shirpur turmeric crop water shortage farmers crisis pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Crisis on farmers
  • Crop damage
  • Washim news

संबंधित बातम्या

Farmers New Demand : कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांचे बक्षीस? शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे नवीन मागणी; काय आहेत मागण्या?
1

Farmers New Demand : कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांचे बक्षीस? शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे नवीन मागणी; काय आहेत मागण्या?

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी
2

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा
3

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन
4

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.