Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिंड्यांना 2 कोटी 80 लाखांचे अनुदान मंजूर, थेट खात्यात वाटप सुरू; प्रत्येक दिंडीला मिळणार तब्बल…

विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या थेट देखरेखीखाली निधीचे वारकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वाटप सुरू करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 01:58 PM
दिंड्यांना 2 कोटी 80 लाखांचे अनुदान मंजूर, थेट खात्यात वाटप सुरू; प्रत्येक दिंडीला मिळणार तब्बल...

दिंड्यांना 2 कोटी 80 लाखांचे अनुदान मंजूर, थेट खात्यात वाटप सुरू; प्रत्येक दिंडीला मिळणार तब्बल...

Follow Us
Follow Us:

बारामती : महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मिता असलेल्या आषाढी वारीसाठी राज्य सरकारने वारकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत गेल्या दोन वर्षांपासून मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना देण्यात येणारे आर्थिक अनुदान यावर्षीही निरंतर सुरू ठेवण्यात आले आहे. विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या थेट देखरेखीखाली या निधीचे वारकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वाटप सुरू करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” मार्फत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारी सन २०२६ करीता हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. २ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार (GR), यावर्षी वारीकरीता येणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी रुपये २०,००० (वीस हजार) प्रमाणे एकूण रुपये २ कोटी ८० लाख इतके वित्तीय अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.

वारीच्या नेटके नियोजनासाठी पाऊल

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची आणि भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. या पायी वारीमध्ये प्रामुख्याने राज्यातील कष्टकरी, शेतकरी आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने आणि अत्यंत श्रद्धेने सहभागी होतात. या वारकरी बांधवांना वारीदरम्यान सुयोग्य सोयी-सुविधा पुरवणे तसेच वारीचे सूक्ष्म व नेटके नियोजन करणे या पवित्र हेतूने शासनाने दिंड्यांना हे आर्थिक अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.

निधी वाटपाची सद्यस्थिती आणि उद्दिष्ट

एकूण उद्दिष्ट: चालू वर्षामध्ये एकूण १,४०० दिंड्यांना हे अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पात्र दिंड्या : प्राप्त अधिकृत माहितीनुसार, सद्यस्थितीत एकूण १,१९९ पात्र दिंड्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

थेट लाभ : यापैकी १,००० दिंड्यांचे बँक तपशील प्राप्त झाले असून, त्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया अत्यंत गतिमान करण्यात आली आहे.

उर्वरित प्रक्रिया: उर्वरित १९९ दिंड्यांच्या बँक खात्यांचे तपशील प्राप्त होताच तात्काळ निधी वर्ग करण्यात येईल. तसेच वारीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ४१ नवीन दिंड्यांच्या बाबतीतही आवश्यक ती पडताळणी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर

दिंडी प्रमुखांना महत्त्वाचे आवाहन

“ज्या दिंड्यांचे बँक तपशील अद्याप प्राप्त झालेले नाहीत, अशा दिंडी प्रमुखांनी आपले बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे किंवा विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे त्वरित सादर करावेत. जेणेकरून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात विनाविलंब जमा करता येईल,” असे आवाहन मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

Web Title: Financial assistance is being provided to dindis through the cm warkari mahamandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • Palkhi Sohala

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
2

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
3

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
4

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.