Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Raid : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ महागात! लेबलशिवाय विक्री सुरू होती सौंदर्यप्रसाधने; FDA ने जप्त केला ₹10.94 लाखांचा साबणसाठा

मुंबईतील जोगेश्वरी येथील जे. के. सोप बाजारवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत सुमारे ₹10.94 लाख किमतीचा बिनलेबल टॉयलेट साबण जप्त केला आहे. उत्पादनावरील आवश्यक माहिती नसतानाही विक्रीसाठी ठेवलेला माल आढळून आल्याने संबंधित विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून साबणाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 16, 2026 | 04:19 PM
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ महागात! लेबलशिवाय विक्री सुरू होती सौंदर्यप्रसाधने; FDA ने जप्त केला ₹10.94 लाखांचा साबणसाठा

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ महागात! लेबलशिवाय विक्री सुरू होती सौंदर्यप्रसाधने; FDA ने जप्त केला ₹10.94 लाखांचा साबणसाठा

Follow Us
Follow Us:
  • ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ महागात!
  • लेबलशिवाय विक्री सुरू होती सौंदर्यप्रसाधने
  • FDA ने जप्त केला ₹10.94 लाखांचा साबणसाठा
Mumbai FDA Raid News Marathi : मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई करत ₹10,93,692 किमतीचा बिनलेबल (Unlabelled) टॉयलेट साबण जप्त केला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या बृहन्मुंबई विभागाच्या पथकाने 14 जुलै 2026 रोजी मेसर्स जे. के. सोप बाजार, कादर इस्माईल इस्टेट, मोमीन कॉलनीजवळ, पटेल इस्टेट रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान विक्रीसाठी ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील टॉयलेट साबणांवर बॅच/लॉट क्रमांक, उत्पादन दिनांक, ‘यूज बिफोर’ (Use Before), उत्पादन परवाना क्रमांक तसेच उत्पादकाचे नाव आणि पत्ता यांसारखी कायद्याने अनिवार्य असलेली माहिती नमूद नसल्याचे आढळून आले.

Pune FDA News : अरे बापरे! शॅम्पू, केमिकल मिसळून तयार होत होतं दूध; पुण्यात FDAची 2 कोटींच्या रॅकेटवर कारवाई

अशा प्रकारे आवश्यक लेबलशिवाय सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणे हे औषधे व प्रसाधने कायद्याचे उल्लंघन मानले जाते. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण माल जप्त केला असून दोन नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणात नबी उल्लंघा यांच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती FDA ने दिली आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हे FDA चे सर्वोच्च प्राधान्य आहे. आवश्यक लेबलिंगशिवाय कोणतेही सौंदर्यप्रसाधन बाजारात विक्रीस ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा उत्पादनांचा स्रोत, गुणवत्ता आणि सुरक्षितता पडताळणे कठीण होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” या कारवाईमुळे ग्राहकांनी कोणतेही सौंदर्यप्रसाधन किंवा वैयक्तिक वापराची उत्पादने खरेदी करताना त्यावरील उत्पादनाची माहिती, परवाना, उत्पादन दिनांक आणि वापरण्याची अंतिम मुदत तपासूनच खरेदी करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, याआधी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील तीन हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. एफडीएने सांगितले की, मुंबईतील भेंडी बाजार आणि उमरखडी परिसरातील एकूण सहा हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. यापैकी तीन हॉटेल्स अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.

Mumbai Hotels FDA Raid: तुकाराम मुंढेंचा मोठा धडाका! मुंबईतील ‘या’ ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित; अमरावतीतही मोठी कारवाई

Web Title: Mumbai fda seizes unlabelled toilet soap worth rs 10 94 lakh jogeshwari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • FDA
  • maharashtra
  • Mumbai
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
1

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन
2

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन

“आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील…” शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड
3

“आयुष्यभर पुजारी साहेब लक्षात राहील…” शेवगाव दंगलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षांना कसं गोवलं? खाकीचा भयानक चेहरा उघड

Real Estate: अलिबागच्या रिअल इस्टेटला नवी झळाळी; 40 एकरच्या प्रकल्पातून 5 वर्षांत 4,500 कोटींच्या महसुलाचे लक्ष्य
4

Real Estate: अलिबागच्या रिअल इस्टेटला नवी झळाळी; 40 एकरच्या प्रकल्पातून 5 वर्षांत 4,500 कोटींच्या महसुलाचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.