Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीला रासपचा रामराम? महादेव जानकर म्हणाले, भीक मागून ही…

सध्या राज्यात आणि देशात अनुक्रमे येऊ घातलेल्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महारष्ट्रातील राजकारणात दररोज नवे नवे राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. अजित पवार भाजप सोबत गेल्याने महायुतीची ताकत आणखीनच वाढलेली आहे. तर, महाविकास आघाडीकडूनही निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच राज्यात असे काही प्रादेशिक पक्ष आहे जे एकट्याने निवडणुकीत उभे राहून विजय मिळवतात.

  • By Aparna
Updated On: Aug 21, 2023 | 07:28 PM
महायुतीला रासपचा रामराम? महादेव जानकर म्हणाले, भीक मागून ही…
Follow Us
Follow Us:

सध्या राज्यात आणि देशात अनुक्रमे येऊ घातलेल्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महारष्ट्रातील राजकारणात दररोज नवे नवे राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. अजित पवार भाजप सोबत गेल्याने महायुतीची ताकत आणखीनच वाढलेली आहे. तर, महाविकास आघाडीकडूनही निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच राज्यात असे काही प्रादेशिक पक्ष आहे जे एकट्याने निवडणुकीत उभे राहून विजय मिळवतात. त्याच पैकीच एक राष्ट्रीय समाज पक्ष आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी मागच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला होता . आतापर्यंत त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. जानकर सध्या रासपच्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. अशातच त्यांनी आगामी निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

काय म्हणाले जानकर? 
जानकरांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली. यावेळी रासपने महायुतीची साथ सोडलीय का? या प्रश्नावर जानकर म्हणाले, या राज्यात, देशात आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे, यासाठी गेल्या दिड महिन्यांपासून आम्ही रासपची जनस्वराज्य यात्रा काढली आहे. युतीबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी (महायुती) आम्हाला बोलावलं नाही आणि आम्हीसुद्धा त्यांना गृहित धरलं नाही.अलिकडेच त्यांची एनडीएची बैठक झाली. त्या बैठकीसाठी त्यांनी आम्हाला निमंत्रण पाठवलं नव्हतं. आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. एनडीए किंवा इंडियापैकी (विरोधकांची आघाडी) कोणीच आम्हाला निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे आम्ही सध्या एकटे आहोत आणि एकटेच चालत आहोत. मला असे वाटते की, भीक मागून हक्क मिळत नाहीत. सत्ता मिळवायची असेल तर स्वतःच्या हिंमतीवर आणि जबाबदारीने घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे.

 

Web Title: Bye bye to rsp to mahayuti mahadev jankar saidbegging this nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2023 | 07:28 PM

Topics:  

  • Mahadev Jankar
  • maharashtra
  • RSP

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.