Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरपीडित नावेदला मिळाली खरी ईदी, तरुणाला मुख्यमंत्री सहायता निधीतून ३० लाखांची मदत

एका तरुणासाठी यंदाची ईद एक नवीन अशा घेऊन आली आहे. तो तरुण काही वर्षांपासून ब्लड कॅन्सरशी लढा देत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतुन ३० लाखांची मदत करण्यात आली आहे. त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2025 | 01:43 PM
devendra fadanvis (फोटो सौजन्य - social media)

devendra fadanvis (फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Close
Follow Us:

अमरावतीतील २३ वर्षीय नावेद अब्दुल नईम या तरुणासाठी यंदाची ईद एक नवीन आशा घेऊन आली आहे. गेल्या काही वर्षांपासून तो ब्लड कॅन्सरशी (तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया) लढतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलता व मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या तत्परतेने नावेदवर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले असून, त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. कॅन्सरमुळे त्याचे १२ किलो वजन घटले होते. तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव, चक्कर येणे असे गंभीर परिणाम त्याच्या शरीरावर दिसून येत होते. २०२३ मध्ये पहिल्यांदा निदान झालेल्या या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने नावेदच्या कुटुंबावर मोठे संकट आले.

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत? मग त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

मुख्यमंत्री सहायता निधीन ट्रस्टच्या सहकार्याने झालेले उपचार माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अनमोल आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून मदतीचा हात पुढे केला नसता, तर कदाचित माझ्यावर उपचार झाले नसते. त्यापुढील कल्पना न केलेली बरी! आज माझ्यावर उपचार होत आहेत, हीच माझ्यासाठी आणि परिवारासाठी ‘खरी ईदी’ आहे.
– नावेद अब्दुल नईम

वडिलांची परिस्थिती बेताची
वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असून, ते अमरावतीतील एका कापड दुकानात काम करतात. तीन मुलींचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना नावेदच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ३० ते ३५ लाख रुपये उभे करणे त्यांना अशक्यप्राय होते, अशी त्यांची परिस्थिती आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून मदतीचा हात
मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपये, टाटा ट्रस्टकडून १५ लाख रुपये, तर उर्वरित रक्कम धर्मादाय रुग्णालयाच्या मद‌तीतून कोकिलाबेन हॉस्पिटल आणि काही प्रमाणात सिद्धिविनायक ट्रस्टकडून मिळाली. या मदतीमुळे नावेदच्या उपचारांचा मार्ग सुकर झाला आहे. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नावेदवर अत्याधुनिक उपचार सुरू करण्यात आले आहेत.

उपचारात प्रगती स्टेम सेल ट्रान्सप्लांटची तयार
सध्या नावेदवर मिनी हायपर सिव्हीएडी किमोथेरपी आणि इतर औषधोपचार सुरू आहेत. त्याच्या २१ वर्षीय बहिणीची एचएलए जुळणी झाल्याने ती दाता म्हणून पात्र ठरली आहे. ४ एप्रिल रोजी तिच्या स्टेम सेल्स नावेदच्या शरीरात प्रत्यारोपित ट्रान्सप्लांट मुळे नावेदच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने त्याच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे आणि आशेचे वातावरण आहे. वडिलांनी अमरावतीचे आमदार संजय खोडके व सुलभा खोडके यांच्याकडे धाव घेतल्यानंतर मदत मिळाली.

परिवाराकडून कृतज्ञता व्यक्त
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष टीमचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. त्याच्या आई आणि बहिणींनीही भावूक होताना सांगितले, नावेद आमच्यासाठी केवळ मुलगा, भाऊ नाही, तर आमच्या ‘आयुष्याचा आधार’ आहे. कॅन्सरने त्याला कमकुवत केलं होतं, पण आज त्याला मिळालेल्या मदतीमुळे तो पुन्हा उभा राहू शकतो, हीच आमच्यासाठी ईदची सर्वात मोठी भेट आहे.

तुम्हालाही या रंगाचा कफ येतो का? ते कोणत्या आजाराचे संकेत देतात जाणून घ्या….

Web Title: Cancer patient naved gets a real eid young man gets rs 30 lakhs from chief ministers relief fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • Amravati News
  • cancer
  • CM Devendra Fadanvis

संबंधित बातम्या

Cancer Risk: पुरुषाचा ‘हा’ अवयव गरजेपेक्षा जास्त वाढला तर… 3 कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!
1

Cancer Risk: पुरुषाचा ‘हा’ अवयव गरजेपेक्षा जास्त वाढला तर… 3 कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा
2

शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा

IBS आणि कोलन कॅन्सरमध्ये काय आहे फरक? लक्षणं एकसारखीच; उडू शकतो गोंधळ
3

IBS आणि कोलन कॅन्सरमध्ये काय आहे फरक? लक्षणं एकसारखीच; उडू शकतो गोंधळ

अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त
4

अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.