cough (फोटो सौजन्य- pinterest)
वातावरण बदलला की सर्दी खोकल्याचा त्रास प्रत्येकांना होते. अनेकांना या दरम्यान कफ सुद्धा होतो. या कफचा रंग तुम्हाला अनेक प्रकारच्या बिमारीचा संकेत देतो. तुमच्या कफचा रंग अनेक बिमारीचा संकेत आहे. डॉक्टरांचा म्हणणं आहे की जेव्हा बॅक्टरीया घसा आणि फुफ्फुसात गंभीर संसर्ग करतो तेव्हा खोकल्यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात.
नॉर्मल आणि गंभीर खोकल्यात काय फरक?
नॉर्मल खोकला २ -३ दिवसात आपोआप ठीक होतो. मात्र गंभीर स्थितीमध्ये कफची समस्या होऊ लागते. तुमचा कफाचा रंग तुमच्या आजाराचा आणि शरीराच्या बाबतीत अनेक संकेत देतो. पांढऱ्या रंगाच्या व्यतिरिक्त जर कोणत्या दुसऱ्या रंगाचा कफ निघत असेल तर दुसऱ्या बिमारीचे संकेत असू शकते. कफ पिवळा रंगाचा असतो जे फुफ्फुसांच्या गंभीर संसर्गाचे लक्षण असू शकते. या गंभीर स्थितीला कधीच हलक्यात नाही घेतले पाहिजे. अश्यात तुम्हाला डॉक्टरशी विशेष सल्ला घेतला पाहिजे.
वेगवेगळ्या रंगाच्या कफ देतात अनेक आजारांचे संकेत
कफचा पांढरा रंग
जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा कफ येत असेल तर तुम्हाला तुरंत डॉक्टरशी संपर्क केले पाहिजे. पांढऱ्या रंगाचा कफ टीबीचे संकेत असतात. या रंगाच्या कफ ने समजते की तुमचे फुफुस संक्रमित होत आहे. टीबी किंवा अस्थमाचा रिस्क असते.
पिवळा किंवा हिरवा रंगाचा कफ
जर कफचा रंग हलका पिवळा किंवा हिरवा असेल तर हे फुफ्फुसांच्या संसर्गाचे लक्षण आहे किंवा तुमचा शरीरला टीबीची लागण झाली आहे. अश्यात तुम्हाला लगेच डॉक्टरला दाखवले पाहिजे.
कफमध्ये काळे स्पॉट्स
जर तुमच्या कफ मध्ये काळ्यारंगाचे स्पॉट्स म्हणजे कण दिसत असले तर तुमच्या फुफुसांवर प्रदूषणाचा मोठा परिणाम झाला आहे. हे धूळ आणि प्रदूषणाचे कण असतात जे फुफुसांमध्ये जाऊन फसतात.
चिकट आणि सोनेरी कफ
जर तुमच्या कफचा रंग सोनेरी दिसत असेल आणि चिकट असले तर याचा अर्थ आहे की तुम्हाला सायनुसायटिसचा त्रास होत आहे.
गुलाबी रंगाचा कफ
जर तुमचा कफाचा रंग लाल किंवा गुलाबी आहे तर फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होत आहे. असं तेव्हाच होते जेव्हा नाकाची नळी आणि गळ्यात इन्फेकशन होते. कधीकधी नाकाच्या कोरडेपणामुळे देखील हे होऊ शकते.
काळ्या रंगाचा कफ
काळ्या रंगाचा कफ त्या लोकांना येतो जे लोक जास्त स्मोकिंग करतात. फुफुसांमध्ये गंदगी आणि स्मोकिंगचे कण भरल्यामुळे काळा कफ होतो. कोरोनाशी पीडित असलेल्या लोकांना देखील काळ्यारंगाच्या कफची तक्रार होती. स्मोकिंग करणाऱ्या लोकांना असा कफ दिसल्यास लगेच डॉक्टरला दाखवले पाहिजे.