भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल, विरारमधील कॅश कांड प्रकरण भोवणार?
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि विरार विधानसभेचे भाजपचे उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर नालासोपारा मतदारसंघात पाच कोटी रुपये वाटप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. विरारमधील एका हॉटेलमध्ये याप्रकरणाचा मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता तावडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरारमध्ये नेमकं काय घडले?
विधानसभा निवडणुकीदरम्यान पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या (बाविआ) कार्यकर्त्यांनी तब्बल तीन तास घेरल्याची घटना घडली. त्यातून भाजप आणि बाविघा कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षीतिज ठाकूर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पैसे वाटपाच्या आरोपावरून गोंधळ उडाला. यावेळी बविआचे प्रमुख, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, विनोद तावडे हे आज पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. ही माहिती मला भाजप नेत्याने दिली होती. त्यानंतर आम्ही आज त्या ठिकाणी दाखल झालो.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
मतांसाठी रोख रक्कम वाटल्याचा आरोप
बहुजन विकास आघाडीकडून पालघर जिल्ह्यात मतांसाठी रोख रक्कम वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या जागांवर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. हितेंद्र ठाकूर हे वसईतून, तर त्यांचा मुलगा क्षितिज नालासोपारामधून, तर विद्यमान आमदार राजेश पाटील बोईसरमधून निवडणूक लढवत आहेत. तावडे यांच्या बॅगेत पाच कोटी रुपये असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे.
हे देखील वाचा – विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले…
काय आहे या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाचे म्हणणे…
दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता निवडणूक आयोगाची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. नालासोपाऱ्याची जी घटना आहे. त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा आणि आमची निवडणूक यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडी तीथे आमची फ्लाईग स्कॉड पोहोचलेली आहे. सायलेंट प्रिरियडमध्ये उमेदवाराने आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात जाऊन प्रचार करणे अपेक्षित नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.