भाजपचे केंद्रिय नेते विनोद तावडे हे सध्या पैसे वाटल्याच्या आरोपावरून चांगलेच चर्चेत आले आहे. याच पार्श्वभुमीवर आज आपण त्यांच्या नावे असलेल्या संपत्ती, मालमत्तेबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत...
पैसे वाटल्याचा आरोप असलेल्या विनोद तावडेंची एकूण संपत्ती कितीये? वाचा... संपुर्ण माहिती! (फोटो सौजन्य - सोशल मीडीया)
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्या अर्थात २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे.
अशातच आज (ता.१९) विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप भाजपचे केंद्रिय नेते विनोद तावडे यांच्यावर करण्यात आला आहे.
मीडीया रिपोर्टनुसार, विनोद तावडे यांच्या नावावर एकूण 6,97,76,904 कोटींची मालमत्ता आहे. यामध्ये त्यांच्या बँका, वित्तीय संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमधील ठेवी आहेत.
याशिवाय विनोद तावडे यांचे बॉण्ड्स, डिबेंचर आणि कंपन्यांमधील शेअर्समध्ये एकूण 1,00,74,600 कोटींची गुंतवणूक आहे. इतकेच नाही तर ५,८३,९३६ रुपयांच्या स्वरूपात त्यांची विमा पॉलिसी आणि पोस्टल बचत देखील आहे.
याव्यतिरिक्त तावडे यांच्याकडे एकूण 15,87,700 रुपये किंमतीची वाहने आहेत. 9,10,000 रुपये किंमतीचे दागिने आहेत. तसेच त्यांची ७६,८६,३१७ रुपये किंमतीची मालमत्ता देखील आहे.
दरम्यान, तावडे यांची स्थावर मालमत्तेच्या स्वरुपात एकूण ४३ लाखांहून अधिक मालमत्ता देखील आहे.