Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरणावर कारवाईचा बडगा; सरपंचसह ग्रामसेवकावर चोरीचा गुन्हा

कुर्डू गावामध्ये झालेल्या अवैध मुरुम उपसावरुन राज्यभर जोरदार चर्चा झाली. अखेर सरपंचसह ग्रामसेवकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Sep 10, 2025 | 05:46 PM
Case registered against Sarpanch and Gram Sevak in Kurdu village for removing murrum Solapur News

Case registered against Sarpanch and Gram Sevak in Kurdu village for removing murrum Solapur News

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : माढा तालुक्यातील कुर्डू गाव हे मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आले आहे. आयपीएस अंजना कृष्णा यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फोनवरून झालेल्या वादंगानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर देखील हल्ला करण्यात आला. यामुळे कुर्डू गावातील अवैध मुरुम उपसा याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. अखेर सरपंचसह ग्रामसेवकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

मुरूम उपसा प्रकरणाच्या कारवाईमध्ये आता कुर्डू गावच्या सरपंच कुंता चोपडे आणि ग्रामसेवक मोहन पवार या दोघांविरोधात अखेर मुरुम चोरीचा गुन्हा कुर्डूवाडी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. तहसीलदारांची परवानगी न घेता अर्धा एकर क्षेत्रातिल १२० ब्रास आणि ७२ हजार रुपये किंमतीचा मुरुम अवैधरित्या उपसा करुन चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलाठी प्रिती शिंदे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच आणी ग्रामसेवक या दोघांनी संगनमतकरुन मुरुम उपसा केल्याच्या गुन्हाची नोंद झाली आहे. माढा महसुल प्रशासनाने दाखल केलेल्या मुरुम चोरीच्या तक्रारीवरुन कुर्डूत तहसीलदारांची अथवा कोणतीही शासकीय परवानगी न घेता अवैधरित्या मुरुम उपसा झाला आहे, हे दाखल झालेल्या तक्रारीवरून आता उघड झाले आहे. त्यामुळे कारवाई रोखण्यासाठीच आयपीएस अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केलेला हे आधोरेखित झाले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

रस्ता करण्यासाठी गावकऱ्यांना मुरुम लागत होता. मात्र उपसा केलेला हा मुरुम अवैधरित्या, परवाना न घेता उत्खनन केलेला होता हे अंतिमरित्या स्पष्ट झाले आहे. शिवाय याप्रकरणी अण्णा ढाणे, बाबा जगताप, संतोष कापरे आणि नितीन माळी या चौघांसह गावातील इतर १५ ते २० लोकांवर दि. ३ सप्टेंबर रोजी सरकारी कामात अडथळा आणणे, हाणामारी व बेकायदेशीर जमाव जमवणे इत्यादीबाबत गुन्हा दाखल केला आहे.

प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच

कुर्डू येथे सुरू असलेला मुरुम उपसासाठी कोणतीही परवानगी किंबहुना अर्ज देखील दिलेला नाही. विशेष म्हणजे ज्या दोन रस्त्यासाठी मुरूम उपसा सुरु असल्याचा दावा केला जातोय, त्या रस्त्यासाठी दिलेली वर्कऑर्डरची मुदत ही आधीच संपली आहे. एका रस्त्यासाठीची वर्कऑर्डर ऑक्टोबर २०२४ मध्ये तर दुसऱ्या रस्त्याची वर्कऑर्डर मुदत एप्रिल २०२५ मध्ये संपली असल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. कुर्डू गावात मुरूम उपसा संदर्भात झालेल्या प्रकरची तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना सूचना देखील केल्या आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

कोणतीच परवानगी घेतलेली नाही

गावातील तलावातून सार्वजनिक कामासाठी जरी मुरूम उपसा करावायचे असल्यास त्यासाठी तहसीलदार यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कामासाठी कोणतेही रॉयलटी न घेता परवानगी दिली जाते. मात्र कुर्डू गावात झालेला मुरूम उपसा प्रकरणात कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती. तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतील ही माहिती उघड झाली आहे. दरम्यान जिल्हातील अवैध मुरूम, वाळू उपसावरील कारवाई संदर्भत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत अवैध वाळू, मुरूम उपसा संदर्भात कारवाई सुरुच ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केल्याची ही माहिती देखील पुढे आली आहे.

Web Title: Case registered against sarpanch and gram sevak in kurdu village for removing murrum solapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • IPS officer Anjali Krishna
  • Jaykumar Gore
  • Solapur News

संबंधित बातम्या

अंजना कृष्णांना दमदाटी नंतर महसूल अधिकाऱ्यांना मारहाण; कुर्डू गावकऱ्यांची दादागिरी, आता व्हिडिओ काढणाऱ्याला धमकी
1

अंजना कृष्णांना दमदाटी नंतर महसूल अधिकाऱ्यांना मारहाण; कुर्डू गावकऱ्यांची दादागिरी, आता व्हिडिओ काढणाऱ्याला धमकी

विठ्ठल सूतगिरणीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटला; सूतगिरणीच्या जागेवर बाजार समिती उभारण्याचा मानस
2

विठ्ठल सूतगिरणीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटला; सूतगिरणीच्या जागेवर बाजार समिती उभारण्याचा मानस

DYSP Anjana Krushna News: DYSP अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ गांधीगिरी आंदोलन; सोलापुरात नेमंक काय चाललयं?
3

DYSP Anjana Krushna News: DYSP अंजना कृष्णांच्या समर्थनार्थ गांधीगिरी आंदोलन; सोलापुरात नेमंक काय चाललयं?

Baba Jagtap Viral Video: राष्ट्रवादीच्या अध्यक्षाचा अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल;  बाबा जगताप अडचणीत
4

Baba Jagtap Viral Video: राष्ट्रवादीच्या अध्यक्षाचा अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल;  बाबा जगताप अडचणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.