Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील करंबा परिसरात करपलेल्या आणि नुकसान झालेल्या पिकांची अधिकाऱ्यांनी रात्री पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य पाहणीपूर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. पिकांच्या नुकसानीनंतर आता शासनाकडून दुष्काळी मदत किंवा आर्थिक सहाय्याची घोषणा कधी होते,याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 22, 2026 | 10:07 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मदतीच्या घोषणेकडे जिल्ह्याचे लक्ष
  • सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
  • पोलिसांचा चोख बंदोबस्त
Solapur News : पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होऊन सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी २३ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

लातूर व धाराशिव येथील पिकांची पाहणी केल्यानंतर बार्शीमार्गे सोलापूरकडे येताना उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा परिसरात थांबून ते पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाहणीसाठी मंगळवारी दिवसभर जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू होती.

जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सोलापूर-बार्शी मार्गावरील तब्बल ४६ ठिकाणांची पाहणी मंगळवारी रात्री भरपावसात करून संभाव्य स्थळांची चाचपणी केली. अखेर कारंबा जवळील शेतकरी अशोक मनोहर भोरे यांच्या शेतातील पावसाअभावी वाळलेल्या उडीद पिकाची पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी थेट भोरे यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. पोलिस उपायुक्त विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूरज जगताप, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे आणि मार्डीच्या मंडल अधिकारी वैशाली जमदाडे यांनी शेतातील पिकांची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली.

जिल्ह्यात ३१ ऑगस्टअखेर जवळपास ३ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. मात्र, पावसाने दीर्घ दडी मारल्याने सोयाबीन, उडीद, मूग, तूर आणि मक्यासह विविध पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाच्या तुटीमुळे अनेक भागांत पिके करपली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे.

प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करून १७ सप्टेंबर रोजी कृषी आयुक्तालयाकडे नुकसानीचा अहवाल पाठविल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पीक नुकसानभरपाई द्यावी, पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी, राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे.

राज्यात पावसाच्या खंडामुळे अनेक जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी म्हटले असून, प्राथमिक आढाव्यानंतर पीक नुकसानीचे सर्वेक्षण व मदतीची प्रक्रिया राबविण्याचे सरकारने सांगितले आहे.

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

मदतीच्या घोषणेकडे जिल्ह्याचे लक्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्यामुळे सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास येणार आहेत. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोणत्या उपाययोजना जाहीर करतात, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करा
पीक नुकसानभरपाई द्या
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा
जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय करा
शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्या

पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. भोरे यांच्या शेताच्या बांधावरच पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. बार्शी-सोलापूर मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये तसेच दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Solapur news officials reach the fields ahead of the chief minister inspection of withered crops in karamba awaiting announcement of aid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 10:07 PM

Topics:  

  • Farmer Crisis
  • Marathi News
  • Solapur News

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
2

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
4

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.