Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : बोगस बियाणेप्रकरणी गुन्हा दाखल! मध्य प्रदेश राज्यातील कंपनी; तालुका कृषी अधिकाऱ्यांची तक्रार

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील एका बियाणे कंपनीविरुद्ध किनगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या तपासणीनंतर संबंधित कंपनीविरोधात विविध कायद्यांअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 19, 2026 | 07:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या प्रकरणात किनगाव राजा पोलिस ठाण्यात मध्य प्रदेशातील एका बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सिंदखेडराजा येथील कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) जितेंद्र हिम्मतराव सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक २६१/२०२६ नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, ४ जून रोजी दुसरबीड परिसरात संबंधित कंपनीने सदोष सोयाबीन बियाण्यांची विक्री केली. या बियाण्यांची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या तपासणीत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Maharashtra News: ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

या प्रकरणात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कलम ३ व ७, बीज अधिनियम, १९६६ मधील कलम ६, ७, १९ व २१, बियाणे नियम, १९६८ मधील नियम १० व २३ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद शुक्रवारी करण्यात आली असून, ई-साक्ष आयडी क्रमांक ४००४०१८५७४२६५५७९ असा आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सोनल चव्हाण यांनी पूर्ण केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे सदोष बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Buldhana News : २२ हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण! ३३११३ शेतकऱ्यांचा सहभाग; २.६७ कोटींचा प्रीमियम जमा

दरम्यान, या प्रकरणातील तपासानंतर संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार का, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्याकडूनच प्रमाणित बियाणे खरेदी करण्याचे, खरेदीची पावती जतन करून ठेवण्याचे तसेच बियाण्यांबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Case registered regarding spurious seeds in buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Buldhana
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी
1

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
2

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.