Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही अल्पवयीन मुलांना वाहनं चालवायला देताय? तर आताच थांबवा, ‘इथं’ चक्क पालकांवरच दाखल झाले गुन्हे

शहर पोलिसांनी 2 दिवसात विविध 5 ठिकाणी नाकाबंदी करत राबवलेल्या कारवाईत दुचाकी चालवणाऱ्या 24 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर थेट गुन्हे दाखल केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2025 | 09:33 AM
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता 'ई-कुंडली' आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता 'ई-कुंडली' आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली : अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणारे अनेक पालक आपण पाहिले असतील. या अल्पवयीन मुलांमुळेच काही अपघात होताना दिसून आले. असे असताना आता गडचिरोली शहरात पोलिस अॅक्शन मोडवर आल्याचे समोर आले आहे. शहरातील वाहतुकीच्या वाढत्या वर्दळीमुळे अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

अल्पवयीन मुले देखील विनापरवाना दुचाकी चालवत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी 2 दिवसात विविध 5 ठिकाणी नाकाबंदी करत राबवलेल्या कारवाईत दुचाकी चालवणाऱ्या 24 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर थेट गुन्हे दाखल केले आहे. शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांचे धाबे दणाणले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहरातील वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने होऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

या अनुषंगाने शहर पोलिसांनी गुरुवार (दि.3) पर्यंत शहरातील 5 विविध ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत काही अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळून आले.

दरम्यान, या सर्वांकडे कुठल्याही प्रकारचा वाहन परवाना नसताना देखील त्यांच्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी दिल्याने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 कलम 199 (ए) अन्वये सदर 24 पालकांवर गुन्हे दाखल करत वाहने जप्त करण्यात आली.

अपघातांचे प्रमाण कमी करणे हा उद्देश

मोहिमेचा उद्देश शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे हा असून, पालकांनी देखील जबाबदारीने वागून आपल्या मुलांना रस्ते वाहतुकीविषयीच्या सर्व नियमांची माहिती करुन द्यावी. यापुढे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

होऊ शकते 3 वर्षे कारावास किंवा 25 हजारांचा दंड

अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरण्यात येते. सदर कलमानुसार अल्पवयीन बालकाकडून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा घडल्यास अशा वाहनाच्या मालकाला 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा 25 हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे.

Web Title: Cases registered against those who give two wheelers to minors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Police Action

संबंधित बातम्या

President Murmu Wardha Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वर्धा दौऱ्यावर, MGAHV दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार, तयारीला जोर
1

President Murmu Wardha Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वर्धा दौऱ्यावर, MGAHV दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार, तयारीला जोर

Mira Bhayander : पोलिसांसमोर चॉपर काढला अन्….; मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला शिंदे गटाच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
2

Mira Bhayander : पोलिसांसमोर चॉपर काढला अन्….; मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला शिंदे गटाच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahilyanagar News: घुलेवाडी ग्रामपंचायतीवर सतप्त महिलांचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर सुरू करण्याची मागणी
3

Ahilyanagar News: घुलेवाडी ग्रामपंचायतीवर सतप्त महिलांचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर सुरू करण्याची मागणी

Parbhani News : दोन वर्षे उलटली, घोषणा हवेतच; 700 सेवकांचे कामबंद आंदोलन!
4

Parbhani News : दोन वर्षे उलटली, घोषणा हवेतच; 700 सेवकांचे कामबंद आंदोलन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.