Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: या समितीच्या स्थापनेसंदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर चौकशी समितीची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर समिती प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात करेल.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 14, 2026 | 02:54 PM
MPSC, Saurabh Katiyar, Vivek Bhimanwar, Dilip Bhosale, Pune News,

MPSC, Saurabh Katiyar, Vivek Bhimanwar, Dilip Bhosale, Pune News,

Follow Us
Follow Us:
  • MPSC पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनात मोठे फेरबदल.
  • आयएएस सौरभ कटियार यांच्याकडे सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार
  • विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर
Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary:  एमपीएससी पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले. महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशात पुण्यात झालेल्या या आंदोलनाची चर्चा सुरू होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील मागण्यांनुसार, राज्य सरकारने एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगात (एमपीएससी) मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी आणि आयएएस अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे एमपीएससीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही अन्य सदस्याकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

भाजपला मोठा धक्का; मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली

सौरभ कटियार यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान, एमपीएससीचे सचिव सचिन महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. त्यानंतर सचिवपदाचा कार्यभार कोणाकडे दिला जाणार याबाबत चर्चा सुरू होती. आंदोलनानंतर मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

साधारण वर्षभरापूर्वीच सौरभ कटियार यांनी एमपीएससीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे त्यांना आयोगाच्या कामकाजाचा काही प्रमाणात अनुभव असल्यानेच त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत भीमनवार यांना रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

हरपाळकर यांची बदली आणि भीमनवार यांना रजेवर पाठवण्यात आल्याने आयोगातील सचिवपद आणि अध्यक्षपदाच्या कार्यभाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. आता सचिवपदाची जबाबदारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवण्यात आली असून अध्यक्षपदाचा कार्यभार अन्य सदस्याकडे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Abhijeet Dipke Slams PM Modi: दम असेल तर आणीबाणी अधिकृतपणे घोषित करा; अभिजीत दिपकेंचे मोदींना खुले आव्हान

पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या चौकशीसाठी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, चौकशी पूर्ण करण्यासाठी समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

या समितीच्या स्थापनेसंदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर चौकशी समितीची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर समिती प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात करेल.

पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसह एमपीएससीमधील प्रशासकीय बदलांकडे आता विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे

 

Web Title: Saurabh katiyar appointed secretary chairman on leave as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Educational News
  • maharashtra news
  • MPSC
  • MPSC Paper Leak

संबंधित बातम्या

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं
1

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
2

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी
3

Dharavi Redevelopment: धारावीचा चेहरामोहरा बदलणार! ३७ ते ३९ मजली इमारती, १० हजारांहून अधिक घरांची उभारणी

Akola News : इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ; वर्षभरात 10 हजार 148 ई-वाहने रस्त्यावर
4

Akola News : इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ; वर्षभरात 10 हजार 148 ई-वाहने रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.