Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओडिशा AM/NS इंडिया खो खो हाय परफॉर्मन्स सेंटरच्या दोन वर्षांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा उत्सव साजरा

ओडिशा AM/NS इंडिया खो खो हाय परफॉर्मन्स सेंटरचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. खो खो निवड चाचणी 2026 मधून 19 नव्या खेळाडूंना सेंटरमध्ये प्रवेश देण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 29, 2026 | 08:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

ओडिशा AM/NS इंडिया खो खो हाय परफॉर्मन्स सेंटरने (ओडिशा AM/NS KHPC), पुरी येथे आपला दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच, खो खो निवड चाचणी 2026 अंतर्गत नव्या आशादायी खेळाडूंनाही सेंटरमध्ये प्रवेश देण्यात आला. भारतासाठी भविष्यातील खो खो चॅम्पियन्स घडवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

मुलांच्या ताटात आता फक्त पौष्टिक आहार! राज्यातील सर्व शाळांसाठी तुकाराम मुंढे यांची नवी नियमावली, विनापरवाना खाद्यविक्रीवर थेट…

आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS इंडिया) आणि ओडिशा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेले हे हाय परफॉर्मन्स सेंटर देशातील खो खो खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच पंच आणि प्रशिक्षक घडवण्याचेही काम करत आहे. गेल्या दोन वर्षांत या सेंटरच्या खेळाडूंनी खो खो वर्ल्ड कप 2025, नॅशनल गेम्स, खेलो इंडिया यूथ गेम्स, तसेच ज्युनियर, सिनियर आणि सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कालावधीत खेळाडूंनी 30 हून अधिक राष्ट्रीय, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत 48 पदके जिंकली आहेत.

AM/NS इंडियाचे HR आणि प्रशासन विभागाचे संचालक व उपाध्यक्ष आशुतोष तेलंग यांनी सांगितले की, अवघ्या दोन वर्षांत या सेंटरने खो खो क्षेत्रात दर्जेदार प्रशिक्षण आणि गुणवत्ता विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश त्यांच्या मेहनतीबरोबरच सेंटरच्या सक्षम प्रशिक्षण व्यवस्थेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला भारतीय पुरुष खो खो संघाचा कर्णधार प्रतीक वायकर यांच्यासह खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रद्युम्न मिश्रा, AM/NS इंडियाचे HR (पूर्व) प्रमुख डॉ. देवव्रत दश, CSR प्रमुख डॉ. विकास यादवेंदू आणि ‘स्पोर्ट्स फॉर ऑल’ (SFA)चे प्रोजेक्ट हेड सागर सामल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले आणि नव्या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले.

Rain Alert: पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर….

खो खो निवड चाचणी 2026 नंतर सेंटरमध्ये ज्युनियर आणि सिनियर गटातील 31 खेळाडूंनी आपले स्थान कायम राखले, तर 10 मुले आणि 9 मुली अशा 19 नव्या खेळाडूंना प्रवेश देण्यात आला. सब-ज्युनियर आणि ज्युनियर गटातील खेळाडूंच्या पुढील स्तरावर झालेल्या प्रगतीमुळे नव्या खेळाडूंना संधी उपलब्ध झाली. याशिवाय विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात खेळाडूंनी वेग, चपळाई आणि रणनीतीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. सेंटरने आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करत जागतिक दर्जाचे खो खोपटू घडवण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला आहे.

Web Title: Celebration of two years of sporting excellence at the odisha amns india kho kho high performance centre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Odisha
  • Odisha news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.