Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganpati Special Trains 2025: आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर

मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने आणखी ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 02, 2025 | 03:26 AM
गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर (फोटो सौजन्य-X)

गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मध्य आणि कोकण रेल्वेने मुंबईत गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने आणखी ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-एलटीटी मार्गावर आणि दिवा-खेड-दिवा मेमू मार्गावर धावतील. यामुळे गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांना त्यांच्या घरी जाणे आणि परतणे सोपे होईल. रेल्वेने आधीच २५० विशेष गाड्यांची घोषणा केली होती. आता मुंबई-कोकण मार्गावर एकूण २९६ गणपती विशेष गाड्या धावतील.

एसटीचे लवकरच रिटेल इंधन विक्रीत पदार्पण, परिवहनमंत्र्यांची माहिती

तिकिटे कधी बुक करायची?

मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने संयुक्तपणे प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अनारक्षित गाड्यांचे तिकिटे यूटीएसवरून घेता येतील.

(०११३१/२) एलटीटी ते सावंतवाडी रोड-एलटीटी (८ फेऱ्या)

०११३१ विशेष ट्रेन गुरुवार आणि रविवारी सकाळी ८.४५ वाजता एलटीटीहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीचा प्रवास (०११३२) सावंतवाडीहून रात्री ११.२० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे.

या गाडीला थांबे

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि जराप.

दिवा-खेड-दिवा मेमू अनरिझर्व (३६ फेऱ्या)

ही दिवा येथून दुपारी १.४० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता खेड येथे पोहोचेल. परतीचा प्रवास खेड येथून सकाळी ८ वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजता दिवा स्टेशनवर संपेल. ही गाडी २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दररोज धावणार आहे.

तसेच मध्य रेल्वेने २५० गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सुरू झाल्या आहेत. यासोबतच पश्चिम रेल्वेने ४४ विशेष गाड्या चालवण्याची घोषणाही केली आहे. याचा फायदा मुंबई आणि विरार दरम्यान राहणाऱ्या कोकणी लोकांना होईल.

– ट्रेन क्रमांक ०११५१/२ सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत धावेल. सीएसएमटीहून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडीला दुपारी २.२० वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या ४० फेऱ्या असतील.

– ट्रेन क्रमांक ०११०३/४ सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत धावेल. सीएसएमटीहून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. ति

– ट्रेन क्रमांक ०११५३/४ सीएसएमटी- रत्नागिरी-सीएसएमटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत धावेल. सीएसएमटीहून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि रात्री ८.१० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

– ट्रेन क्रमांक ०११६७/८ एलटीटी- सावंतवाडी-एलटीटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत धावेल. ही ट्रेन एलटीटीहून रात्री ९ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. तिच्या ३६ फेऱ्या देखील असतील.

– ट्रेन क्रमांक ०११७१/२ एलटीटी- सावंतवाडी रोड-एलटीटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत धावेल. ही ट्रेन सकाळी ८.२० वाजता एलटीटीहून निघेल आणि रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

– ट्रेन क्रमांक ०११२९/३० एलटीटी- सावंतवाडी रोड-एलटीटी (दर मंगळवारी): ही ट्रेन २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी धावेल. ही ट्रेन सकाळी ८.४५ वाजता एलटीटीहून निघेल आणि रात्री १०.२० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

– ट्रेन क्रमांक ०११८५/६ एलटीटी- मडगाव-एलटीटी (दर बुधवारी): ही ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल. ही एलटीटीहून दुपारी १२.२० वाजता निघेल आणि मडगावला दुपारी २.३० वाजता पोहोचेल.

– ट्रेन क्रमांक ०११६५/६ एलटीटी- मडगाव-एलटीटी (एसी): ही ट्रेन २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी धावेल. ही एलटीटीहून दुपारी १२.४५ वाजता निघेल.

पश्चिम रेल्वे ४४ गणपती विशेष गाड्या

पश्चिम रेल्वेने ४४ गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा देखील केली आहे. या गाड्या चर्चगेट आणि विरार दरम्यान धावतील. या गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरू होईल.

बाप रे! 1 लाईट आणि 1 पंखा अन् वीज बिल आले तब्बल ८३००० रूपये

Web Title: Central and konkan railways announces to run ganeshotsav special 46 additional trains on mumbai konkan route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 03:26 AM

Topics:  

  • central railway
  • ganeshotsav 2025
  • konkan railway
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.