
दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
एक वातानुकूलित द्वितीय, एक वातानुकूलित तृतीय, ११ ते १३ शयनयान डबे, ४ ते ७ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन.
प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा NTES App डाउनलोड करून तपशीलवार वेळापत्रक पाहू शकतात.
प्रवाशांसाठी दिवाळी-छठ पूजा बंपर भेट
दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या निमित्ताने प्रवाशांची सोय व्हावी यासाठी भारतीय रेल्वेने एकूण १२०११ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यापैकी मध्य रेल्वे (Central Railway) १९ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या दरम्यान विविध राज्यांमध्ये १९९८ दिवाळी विशेष फेऱ्या (आरक्षित आणि अनारक्षित) चालवत आहे.
मध्य रेल्वे एकूण १९९८ विशेष फेऱ्या (अप + डाउन) चालवत आहे. यापैकी ६०० हून अधिक गाड्या मुंबई परिसरातून अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सर्व विशेष गाड्यांमुळे ३० लाखाहून अधिक प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे. आतापर्यंत ७०५ फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्यातून १०.६८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यांसारख्या ठिकाणी प्रवासासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध होत आहेत.