Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्म-मृत्यू नोंदणीचा केंद्रीय सर्व्हर ठप्प! जिल्ह्यात दाखला वितरण खोळंबले; पूर्वसूचना नसल्याने फरफट

सोलापूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कक्षात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. जन्म दाखला, मृत्यू दाखला, नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना 'सव्र्व्हर डाऊन' असल्याचे सांगितले, त्यामुळे अनेकांना आपली काम न करता पुन्हा जावे लागले.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2026 | 03:30 PM
जन्म-मृत्यू नोंदणीचा केंद्रीय सर्व्हर ठप्प! जिल्ह्यात दाखला वितरण खोळंबले; पूर्वसूचना नसल्याने फरफट

जन्म-मृत्यू नोंदणीचा केंद्रीय सर्व्हर ठप्प! जिल्ह्यात दाखला वितरण खोळंबले; पूर्वसूचना नसल्याने फरफट

Follow Us
Follow Us:

डिजिटल भारताच्या संकल्पनेअंतर्गत नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात असताना, सोमवारी केंद्र शासनाच्या जन्म-मृत्यू नोंदणी प्रणालीचा सव्र्व्हर बंद पडल्याने सोलापूरसह राज्यातील अनेक महापालिकांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. ‘सिस्टम अपडेट’ सुरू असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, दिवसभर सेवा पूर्ववत न झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: धरणांमध्ये ४१ टक्के जलसाठा शिल्लक! पावसाळ्यात यंदा धरणांतून विसर्गाचे प्रशासनाचे संकेत

सोलापूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाबाहेर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. जन्म दाखला, मृत्यू दाखला, नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना ‘सव्र्व्हर डाऊन’ असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेकांना निराश होऊन माघारी परतावे लागले, तर काहींनी सेवा सुरू होईल या आशेने दिवसभर कार्यालयाबाहेर प्रतीक्षा केली.

केंद्र शासनाच्या नियंत्रणाखालील जन्म मृत्यू नोंदणीच्या केंद्रीय सॉफ्टवेअरवर देशभरातील नोंदणी प्रक्रिया अवलंबून आहे. त्यामुळे सर्व्हर बंद पडताच संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. दिवसभरात एकाही जन्म किंवा मृत्यूची नोंदणी होऊ शकली नाही. तसेच दाखला वितरण आणि दुरुस्तीची कामेही रखडली. या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांसह संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचीही मोठी तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, सर्व्हर बंद राहणार असल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. परिणामी, दूरवरून आलेल्या नागरिकांना फटका बसत आहे.

Amravati News: वन्यप्राण्यांच्या दहशतीने शेती संकटात! पिकांचे नुकसान मोठे, भरपाई मात्र अपुरी; शेतकरी हवालदिल

‘एक देश, एक डिजिटल प्रणाली’ समोर आता विश्वासार्हतेचे आव्हान

केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक डिजिटल प्रणाली’ या संकल्पनेला तांत्रिक अडचणींचा मोठा फटका बसल्याचे सोमवारी दिसून आले. एका केंद्रीय सर्व्हरमधील बिघाडामुळे राज्यभरातील जन्म-मृत्यू नोंदणी व्यवस्था ठप्प झाली. डिजिटल सेवांची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पर्यायी सर्व्हर, बॅकअप यंत्रणा आणि पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Central server for birth and death registration down certificate issuance stalled in the district lack of prior notice causes harassment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • digital
  • maharashtra
  • Solapur

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.