Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध; २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज

इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर- बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बिनविरोध पार पडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 05, 2026 | 04:43 PM
कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध; २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध; २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज

Follow Us
Follow Us:
  • कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध
  • हर्षवर्धन पाटलांसह २१ संचालक विजयी
  • निवडणूक बिनविरोध, पण प्रश्न अनुत्तरितच!
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर- बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२०३१ ची पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. ४) बिनविरोध पार पडली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी ( दि. ४ ) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केली. कारखान्याच्या बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील आदी मान्यवर उमेदवारांचा समावेश आहे.

 

बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे

हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील, राकेश रमेशप्रसाद शुक्ला, रविंद्र वामन सरडे, शांतीलाल दत्तात्राय शिदे, छगन धोडीबा भोंगळे, निलेश शामराव देवकर, राजेद्रकुमार प्रतापराव देवकर, संतोष लक्ष्मण काळे, श्रीकांत खिंवराव देवकर, विजय विठ्ठल खर्चे, पराग रमेशराव जाधव, रणजित नामदेव निकम, रोहित राजेंद्र गायकवाड, बिभिषण कल्याण नलवडे, अतुल शिवाजी शिगाडे, वसंत खंडू मोहोळकर, हरिश्चंद्र सदाशिव पारेकर, रत्नमाला संपत पवार, सुमन नारायण व्यवहारे, अमोल सुभाष जाधव.

सदर निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच प्रदीप गारटकर, प्रवीण माने आदी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांचे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार्य मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा : २५० सीसीटीव्हींचा माग, १० दिवसांची मेहनत; अखेर सराईत चोरट्याला पाठलाग करुन पकडले

…प्रश्न मात्र अनुत्तरित!

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली; मात्र या निवडीमागील प्रक्रियेवरून उपस्थित झालेले प्रश्न अद्याप कायम आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचे आरोप, अंतिम मुदतीनंतर अर्ज माघारी झाल्याचा आक्षेप आणि निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्या स्पष्टीकरणावरून निर्माण झालेली चर्चा यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता ऐरणीवर आली आहे. त्यातच अमोल सुभाष जाधव यांच्या ओबीसी व अनुसूचित जाती प्रवर्गातील कथित दोन जात प्रमाणपत्रांबाबत शरद चितारे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचा दावा केला आहे. निवडणूक स्थगित करून फेरनिवडणुकीची मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे, कारखाना चालविण्याची जबाबदारी बाबुराव बोत्रे-पाटील यांच्याकडे असल्याच्या पार्श्वभूमीवर नव्या संचालक मंडळाचे अधिकार नेमके किती, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. एकेकाळी राज्यात नावाजलेला कर्मयोगी कारखाना अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नसताना सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध कशी पार पडली?

    Ans: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली.

  • Que: कारखान्याच्या निवडणुकीत कोणत्या प्रमुख उमेदवारांची बिनविरोध निवड झाली?

    Ans: कारखान्याच्या संचालक मंडळावर हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील यांच्यासह एकूण २१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

  • Que: कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर कोणते आक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत?

    Ans: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचे आरोप, मुदतीनंतर अर्ज माघारी घेतल्याचा आक्षेप आणि अमोल सुभाष जाधव यांच्या जात प्रमाणपत्रांबाबत शरद चितारे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचा दावा करून निवडणूक स्थगित करण्याची व फेरनिवडणुकीची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: The election for the karmayogi shankarraoji patil sugar factory has been held unopposed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • indapur news
  • maharashtra
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान
1

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही
2

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस
3

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा…; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा
4

फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा…; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.