Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: 12 वर्षांचा धक्कादायक घोळ! एकाच आधार क्रमांकामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे अनुदान दुसऱ्याच्या खात्यात…

चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आधार क्रमांकातील गंभीर तांत्रिक त्रुटीमुळे तब्बल 12 वर्षांपासून सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही. पीएम किसान, नमो शेतकरी आणि इतर डीबीटी अनुदानाची रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होत असल्याचा आरोप समोर आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 26, 2026 | 02:07 PM
Chandrapur News: 12 वर्षांचा धक्कादायक घोळ! एकाच आधार क्रमांकामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे अनुदान दुसऱ्याच्या खात्यात...

Chandrapur News: 12 वर्षांचा धक्कादायक घोळ! एकाच आधार क्रमांकामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे अनुदान दुसऱ्याच्या खात्यात...

Follow Us
Follow Us:
  • एकाच आधार क्रमांकामुळे शेतकऱ्याचे सरकारी अनुदान दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप.
  • पीएम किसान, नमो शेतकरीसह अनेक योजनांचा लाभ 12 वर्षांपासून मिळाला नाही.
  • वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याचा दावा.
चिमूर: चिमूर तालुक्यातील गदगाव येथील शेतकरी सुनील संपत कारमोरे यांना एकाच आधार क्रमांकाच्या गंभीर त्रुटीमुळे गेल्या १२ वर्षांपासून शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे, त्यांचा आधार क्रमांक आणि त्याच गावातील जगदीश तुळशीराम देवगडे (हल्ली मुक्काम नागपूर) यांचा आधार क्रमांक एकच असल्याचा दावा करण्यात आला.

Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात

दोघांचे आधार क्रमांक एकच असल्याने कारमोरे यांच्या हक्काची डीबीटीद्वारे मिळणारी शासकीय अनुदानाची रक्कम प्रोत्साहनपर भत्ता, पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान निधी, विविध प्रोत्साहनपर अनुदाने व अन्य शासकीय लाभांची रक्कम थेट देवगडे यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे कारमोरे यांनी सांगितले. या प्रकाराबाबत संबंधितांना वारंवार माहिती देऊनही रक्कम परत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.  (फोटो सौजन्य – AI Created)

तालुक्यातील गदगाव येथील शेतकरी कारेमोरे यांच्या नावाने सर्वे क्रमांक १२५ /१ व ८७ /१ अशा प्रकारे येथेच दोन ठिकाणी शेती आहे. गावातीलच तथा आता नागपूर येथे राहणाऱ्या देवगडे या दोघांचेही आधारकार्ड क्रमांक ४९७३ ७२१२ २७४० आहे. दोघांचेही आधारकार्ड क्रमांक सारखेच असल्यामुळे कारमोरे या शेतकऱ्याला डीबीटीद्वारे प्राप्त होणाऱ्या विविध शासकीय अनुदानाची रक्कम, प्रोत्साहनात्मक रक्कम, प्रधानमंत्री किसान, सन्मान निधी, नमो सन्मान निधी देवगडे यांच्या भारतीय स्टेट बँक येथील खात्यात मागील अनेक वर्षापासून जमा होत आहेत.

शेतीसंबंधी या विविध योजनांचा लाभ का मिळत नाही? याबाबत कारमोरे यांना २०२२ पासून लक्षात आल्यानंतर तहसील कार्यालय, कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर संबंधित विभागांकडे अनेकदा निवेदने व तक्रारी सादर केल्या. मात्र, १२ वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

शंकरपुरातही आधारचा घोळ

यापूर्वी शंकरपूर येथील एका तरुणाच्या आधार कार्डावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकल्याची घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली होती. मात्र, सामान्य शेतकऱ्याच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, कोल्हापूर आणि पुण्यात लाखो रुपयांचा औषधसाठा जप्त

प्रशासनाने माझे व जगदीश देवगडे यांचे सारखेच असलेले आधारकार्ड रद्द करावे. कर्ज माफीचेही पैसे, पीएम किसानचेही पैसे त्यांच्याच अकाउंटमध्ये जमा झाले. सुरुवातीला वाटले आमचीच चुकी असावी. माझे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले. थोडे थोडे पैसे देतो म्हणत होता. आता फोनच उचलत नाही. तहसीलदारांनाही दोनदा निवेदन दिले, शासनाच्या तांत्रिक चुकीचा त्रास मला होत आहे. आता कर्ज माफीचा लाभ कसा मिळणार?- सुनील कारमोरे, गदगाव

तहसीलदार नॉट रिचेबल

चिमुरचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांना दोनदा फोन केला. मात्र त्यांनी फोनच उचलला नाही व प्रतिसादही दिला नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Aadhaar error shocks farmer 12 years of government benefits allegedly credited to another persons bank account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • Aadhaar
  • Chandrapur
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात
1

Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात

Chandrapur News: ‘स्वच्छता अधिभार’च्या नावाखाली एसटीची कमाई; चंद्रपुरात 65 दिवसांत तब्बल 58.50 लाखांची वसुली
2

Chandrapur News: ‘स्वच्छता अधिभार’च्या नावाखाली एसटीची कमाई; चंद्रपुरात 65 दिवसांत तब्बल 58.50 लाखांची वसुली

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’
3

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

Raigad News: शार्लोट लेक कामावर प्रश्नचिन्ह! गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप; माथेरानमध्ये ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

Raigad News: शार्लोट लेक कामावर प्रश्नचिन्ह! गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप; माथेरानमध्ये ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.