Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात

महाडमधील काळ नदीच्या पात्रात हजोर मासे मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. उद्योगांकडून विषारी सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे माशांचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 26, 2026 | 01:48 PM
Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात

Raigad News: महाडमध्ये रासायनिक प्रदूषणाचा कहर! काळ नदीत हजारो मासे मृत, पर्यावरण धोक्यात

Follow Us
Follow Us:
  • काळ नदीत हजारो वळगणीचे मासे मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
  • रासायनिक सांडपाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे.
  • दूषित मासे न खाण्याचे आवाहन करत प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.
महाड: प्रजननासाठी काळ नदीच्या पात्रात आलेल्या वळगणीच्या माशांवर यंदा निसर्गाने नव्हे तर मानवनिर्मित रासायनिक प्रदूषणाने घाला घातला आहे. महाड एमआयडीसी परिसरातील रासायनिक सांडपाण्यामुळे काळ नदीत बुधवारपासून हजारो मासे मृतावस्थेत आढळून आले असून नदीपात्र अक्षरशः मृत माशांनी भरून गेले आहे. जलचरांच्या या सामूहिक मृत्यूमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

21 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; राज्य कामगार विमा योजना लागू करण्याची तयारी

वळगणीचा मासा हा प्रजननाच्या काळात नदीच्या प्रवाहात येत असल्याने या काळाला पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्व मानले जाते. माशांच्या या प्रजनन काळात नदीतील जैवसाखळी टिकून राहण्यास मदत होते. दरवर्षी या हंगामात माशांना पकडण्यासाठी खवय्ये आणि मच्छीप्रेमींची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा जाळ्यात अडकण्याऐवजी हे मासे रासायनिक प्रदूषणाच्या मृत्यूच्या सापळ्यात अडकले आहेत. महाड औद्योगिक परिसरातील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील आमशेत ते खरवली बिरवाडी पुलापर्यंत या मृत माशांचा खच आढळून आला आहे. रोजगाराच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या उद्योगांच्या सावलीत नदी, निसर्ग आणि मानवी आरोग्याचा बळी जात असताना प्रशासनाचे मौन अधिकच अस्वस्थ करणारे ठरत आहे.

नोटिसा, कागदोपत्री कार्यवाहीपलीकडे कारवाई नाही

गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाचा आधार घेत काही उद्योगांकडून विषारी सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्यात कारखान्यांच्या परिसरात साचवून ठेवलेले रासायनिक पाणी पावसाच्या प्रवाहाबरोबर थेट काळ नदीत मिसळल्याने हजारो माशांचा बळी गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

यापूर्वीही परिसरातील नाल्यांमधील रासायनिक पाण्याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र अहवाल, नोटिसा आणि कागदोपत्री कार्यवाहीच्या पलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

प्रदूषण नियंत्रणाच्या नावाने केवळ कागदी घोडे नाचवतात

प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याने प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणीय नियमांची कोणतीही भीती उरलेली नाही, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे. पावसाच्या आड रासायनिक सांडपाणी नदीत सोडण्याचा प्रकार दरवर्षी घडत असताना प्रशासन मात्र घटनांनंतरच जागे होत असल्याची टीका होत आहे.

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो तयार राहा! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मृत मासे नागरिकांकडून गोळा केल्याचा प्रकार

दरम्यान, नदीत मृत किंवा तडफडणारे मासे काही नागरिकांकडून गोळा केले जात असल्याचे चित्रही समोर आले आहे. दूषित रसायनांच्या संपर्कात आलेले हे मासे आरोग्यास घातक ठरू शकतात, असा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला असून ते न खाण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. काळ नदीचे पाणी शेती, पशुधन आणि दैनंदिन वापरासाठी उपयोगात आणणाऱ्या हजारो नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. जलचर, वन्यजीवन आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या प्रदूषणावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Thousands of fish found dead in mahad kal river chemical pollution allegations spark outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Mahad
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
1

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स
2

Raigad News: जवानांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य! पनवेलमधून सीमेवर जाणार १८ हजार फराळाचे बॉक्स

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा
3

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी
4

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.