Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: शार्लोट लेक कामावर प्रश्नचिन्ह! गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप; माथेरानमध्ये ठेकेदारावर कारवाईची मागणी

माथेरानमधील शार्लोट लेक संवर्धन कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तलावातील गाळ काढण्याचे काम न करताच निधी खर्च झाल्याचा आरोप होत असून, ठेकेदारावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2026 | 03:07 PM
Raigad News: शार्लोट लेक कामावर प्रश्नचिन्ह! गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप; माथेरानमध्ये ठेकेदारावर कारवाईची मागणी

Raigad News: शार्लोट लेक कामावर प्रश्नचिन्ह! गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप; माथेरानमध्ये ठेकेदारावर कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • शार्लोट लेक संवर्धनात गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • काम न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनोज खेडकर यांनी केली आहे.
  • तलावातील गाळ न काढल्याने मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यासह माथेरानच्या पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त झाली आहे.
माथेरान: माथेरान शहरातील पाण्याचा पुरवठा करणाऱ्या शार्लोट लेक तलावाचे संवर्धनाचे काम केंद्र शासनाच्या पाच कोटी निधीमधून माथेरान नगरपरिषद करीत आहे. या तलावातील गाळ काढून दोन किलोमीटर लांब साठवून ठेवायचा असताना गाळ न काढता निधी लाटण्यात आला आहे. दरम्यान कामे न करता निधी लाटणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी माथेरानचे माजी नगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य तसेच शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख मनोज खेडकर यांनी केली आहे.

Karjat News : टोरंट कंपनीचा प्रताप! जलविद्युत प्रकल्पासाठी नियम धाब्यावर? आदिवासींच्या जमिनीत अवजड मशिनरी, ग्रामस्थांचा संताप

केंद्र सरकारच्या अमृत दोनधील माथेरानमधील शार्लोट लेक संवर्धनाचे काम सुरू आहे. या कच्च्या निविदेत त्यामध्ये २००० ट्रक माती (गाळ) तळ्यातून काढून दोन किलोमीटर पर्यंत ट्रान्सपोर्ट करायचा आयटम टेंडरमध्ये दिलेला आहे. ठेकेदाराला याची पूर्ण माहिती असून देखील मागच्या वर्षी थोडाफार गाळ काढून, घोड्याने पांडे प्ले ग्राउंड परिसरात वाहून नेला. मात्र बहुतांश गाळ काढलाच नाही आणि निधी लाटण्यात येत आहे. तो गाळ काढून त्याने दोन किलोमीटर पर्यंत वाहून न्यायचा आहे. हा गाळ भविष्यात माथेरान शहरातील रस्त्यांचे कामासाठी वापरली जावीत यासाठी सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. सुप्रीम कोर्टाने क्लेपेवरचे रस्ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतच्याच कामाला मंजुरी दिलेली आहे. त्यापुढील रस्ते पारंपारिक पद्धतीने करायचे आहेत.

मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यावर होत आहे परिणाम

खेडकर यांच्या म्हणण्यानुसार ठेकेदाराने माती काढण्याचे काम टेंडरप्रमाणे केले नाही तर ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, असे ठरले आहे. गाळ काढायसाठी गेट उघडून देणे म्हणजे भ्रष्टाचाराला साथ देणे असा आरोप मनोज खेडकर यांनी केला आहे. पालिकेचे सर्वसाधारण सभेत देखील शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम टेंडरप्रमाणे ठेकेदाराकडून सर्व गाळ काढून घेतला जावा, कोणत्याही परिस्थितीत एवढी मौल्यवान माती नदीमध्ये सोडून देऊ नये. त्यामुळे मोरबे धरणाच्या तलावातील पाणी साठ्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे, असे खेडकर यांनी सांगितले.

पुरंदर विमानतळ बाधितांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा; मोबदला वितरणासाठीच्या विलंबाचं कारणही सांगितलं

बऱ्याच झाडांच्या मुळांना इजा होण्याची भीती व्यक्त

  • दर वर्षी माती मोरबे धरणात गेली तर एक दिवस मोरबे धरण हे मातीने भरून जाईल.
  • माथेरानच्या या घनदाट वनराई मुळे या ५०० चौ. कि.मी. परिसरात पाऊस पडतो.
  • नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका या आपल्या पर्यावरण/वन संवर्धनावर अवलंबून आहेत.
  • माथेरान हे ५० लाख लोकांच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. एवढी माती रस्त्यासाठी जंगलातून खोदली तर मोठ्या प्रमाणात झाडे मरतील.
  • बऱ्याच झाडांच्या मुळांना इजा होईल आणि माथेरानच्या पर्यावरणाची मोठी हानी होईल, यावर मनोज खेडकर ठाम आहेत.
माथेरान शहरात असलेल्या लाल मातीचे रस्ते दरवी दुरुस्त करावे लागतात. त्यासाठी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रस्ते बनवण्यासाठी माती लागणार आहे. लेक मधील ही माती आपल्याला रस्ते बनवण्यासाठी उपयोगात येईल. हे लक्षात घेऊन टेंडरमध्ये गाळ काढायचं काम झाल पाहिजे.- मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Allegations of fund misuse in matheran charlotte lake desilting work demand to blacklist contractor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Marathi News
  • Matheran
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.