Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: ‘बांबू सिटी’कडे चंद्रपूरची वाटचाल? प्रदूषणावर हरित उपायाची चर्चा, पर्यावरणासह रोजगारालाही चालना

देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या चंद्रपूरसाठी 'बांबू सिटी' ही संकल्पना पर्यावरणपूरक विकासाचा नवा पर्याय ठरू शकते. बांबू लागवड, उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्रदूषण कमी करत स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यावर भर दिला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2026 | 03:07 PM
Chandrapur News: 'बांबू सिटी'कडे चंद्रपूरची वाटचाल? प्रदूषणावर हरित उपायाची चर्चा, पर्यावरणासह रोजगारालाही चालना

Chandrapur News: 'बांबू सिटी'कडे चंद्रपूरची वाटचाल? प्रदूषणावर हरित उपायाची चर्चा, पर्यावरणासह रोजगारालाही चालना

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूरमध्ये प्रदूषणावर नियंत्रणासाठी ‘बांबू सिटी’ संकल्पना राबविण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.
  • बांबू लागवड, उद्योग आणि संशोधनाला चालना दिल्यास पर्यावरणासोबतच रोजगारनिर्मितीलाही मोठी गती मिळू शकते.
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करून ‘बांबू सिटी चंद्रपूर’चा कृती आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर: देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरसमोर पर्यावरण संवर्धनाचे मोठे आव्हान उभे आहे. कोळसा खाणी, औष्णिक वीज प्रकल्प आणि औद्योगिक हालचालींमुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत, बेंगळुरूच्या जक्कूर वॉर्डमध्ये राबविण्यात येत असलेल्या बांबू सिटी’ संकल्पनेच्या धर्तीवर चंद्रपूरमध्येही ‘बांबू आधारित हरित शहर’ उभारण्याची चर्चा पुन्हा वेग घेत आहे.

कोयनेचे पाणी मुंबईकडे? वाशिष्टी नदी वाळणार, कोकण पेटणार; दाभोळ खाडीतील ८४ गावांचा रोजगार धोक्यात?

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, कृषी क्षेत्र, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था (बीआरटीसी) तसेच औद्योगिक परिसर यामुळे हरित विकासासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने बांबू लागवड, प्रक्रिया उद्योग आणि संशोधनाला चालना दिल्यास प्रदूषण नियंत्रणासह रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. बंगळुरूच्या जक्कूरमध्ये प्रत्येक नागरिकाच्या नावाने बांबू लागवड, रिकाम्या जागा, नाले, जलस्रोत परिसर आणि उद्यानांमध्ये बांबू विकसित करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून कार्बन शोषण, तापमान नियंत्रण, जैवविविधता संवर्धन आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. चंद्रपूरमध्येही अशाच प्रकारचे मॉडेल राबविण्याची क्षमता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात बांबूची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असली तरी त्यावर आधारित उद्योग आणि बाजारपेठ अपेक्षित प्रमाणात विकसित झालेली नाही. बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था अस्तित्वात असूनही संशोधन, नवीन प्रजातींचा विकास आणि उद्योगाभिमुख उपक्रमांना अपेक्षित गती मिळालेली नसल्याची चर्चा आहे. प्रशिक्षण घेतलेल्या हजारो तरुणांपैकी अत्यल्प जणांनीच उद्योग उभारल्याचेही समोर येते. महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि मोठ्या उद्योगांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून सरकारी कार्यालये, औद्योगिक परिसर, शाळा-महाविद्यालये, उद्याने, रस्त्यांच्या कडेला तसेच जलस्रोतांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केल्यास शहराच्या हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ होऊ शकते.

जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सीएसआर निधीचा नियोजनबद्ध वापर झाल्यास ‘बांबू सिटी चंद्रपूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ताडोबा पर्यटनाशी जोडून बांबू पर्यटन, बांबू उत्पादने आणि अनुभव केंद्रे विकसित करण्याचीही मोठी संधी चंद्रपूरला आहे. योग्य नियोजन आणि ठोस अंमलबजावणी झाल्यास प्रदूषणग्रस्त चंद्रपूरची ओळख भविष्यात ‘बांबू शहर’ म्हणून निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘बांबू सिटी’साठी मीनाक्षी वाळके यांचा पुढाकार

चंद्रपूरला हरित आणि शाश्वत विकासाचा नवा मार्ग देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बांबू डिझायनर मीनाक्षी वाळके यांनी ‘बांबू सिटी चंद्रपूर’ ही संकल्पना पुढे आणली आहे. त्यांनी औष्णिक वीज प्रकल्प, पश्चिम कोळसा क्षेत्र, महानगरपालिका तसेच अन्य शासकीय व औद्योगिक संस्थांनी त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून बांबू आधारित हरित विकासाला चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

PMC Health Department: पुणे महापालिकेत ५८१ आरोग्य पदे रिक्त; रुग्णालये अन् दवाखान्यांवर अतिरिक्त ताण!

संकल्पना राबविण्यासाठी स्वतंत्र समितीची मागणी

‘बांबू सिटी चंद्रपूर’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा यांनी केली. या समितीत प्रशासन, उद्योग क्षेत्र, बांबू संशोधन संस्था आणि तज्ज्ञांचा समावेश करून समन्वयाच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

हरित विकासासाठी पाऊल

चंद्रपूरमध्ये बांबू आधारित हरित विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी देशातील बांबू क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहकार्याची तयारी दर्शविली आहे. मुंबईतील बांबू आधारित उद्योगसमूहाचे संस्थापक मिलिंद सप्रे यांनी आपल्या उद्योगाचा अनुभव आणि तांत्रिक मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारी व्यक्त केली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur bamboo city green development plan pollution control employment opportunity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
1

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?
2

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
3

Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका
4

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.