Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

खडसंगी ग्रामपंचायत कार्यालयातून महत्त्वाची शासकीय कागदपत्रे मागील खिडकीतून बाहेर नेण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणं आहे. विशेष म्हणजे हा प्रकार सुट्टीच्या दिवशी घडल्याचे सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2026 | 02:53 PM
Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • कॅशबुक, पासबुक, चेकबुक, एमबी, बिल आणि विविध रजिस्टरसह कागदपत्रे तीन थैलीतून बाहेर नेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
  • विशेष ग्रामसभेपूर्वी झेरॉक्स काढण्यासाठी कागदपत्रे बाहेर पाठवली होती, असे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
  • प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी आणि चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
चिमूर: चिमूर तालुक्यातील खडसंगी ग्रामपंचायत कार्यालयातून सुट्टीच्या दिवशी महत्त्वाची शासकीय कागदपत्रे मागील खिडकीतून बाहेर नेण्यात आल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणल्याचा दावा केला. याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. खडसंगी ग्रामपंचायतीसमोर मागील पंधरा दिवसांपासून तरुणांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच्या दोन दिवस आधी, शनिवारी दुपारी सुमारे १ वाजता ग्रामपंचायतीतील कॅशबुक, पासबुक, चेकबुक, एमबी, बिल, विविध रजिस्टर व इतर कागदपत्रे तीन थैलीतून बाहेर नेली जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

ग्रामस्थांनी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली. याबाबत ग्रामपंचायत चपराशी कृष्णा सातपसे यांना विचारणा केली असता, ग्रामपंचायत सचिवांच्या सांगण्यावरून कागदपत्रे बाहेर काढत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर ग्रामपंचायत अधिकारी कवडू तराळे यांनी मंगळवारी होणाऱ्या ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी ती बाहेर पाठविण्यात येत असल्याचे सांगितल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. (फोटो सौजन्य – AI Created)

मात्र, सुट्टीच्या दिवशी आणि मागील खिडकीतूनच कागदपत्रे का नेण्यात आली? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून कागदपत्रे बाहेर नेण्यामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी आणि चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

थैलीत असलेली कागदपत्रे

कॅशबुक, पाणीपुरवठा व सामान्य फंडाची नोंदवही, १५ वा वित्त आयोगाचे रजिस्टर, साठा रजिस्टर, कार्यवाही अहवाल, व्हाउचर फाईल, एमआरजीएस कॅशबुक, पासबुक, चेकबुक, एमबीसह विविध शासकीय कागदपत्रे.

चपराशीकडून सचिवांचे अधिकाऱ्यांकडून नावः झेरॉक्सचा खुलासा!:

कागदपत्रे बाहेर नेण्यामागील कारण विचारण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चपराशी सातपसे यांच्याकडे विचारणा केली. ग्रामस्थांच्या दाव्यानुसार, सचिवांच्या सांगण्यावरून कागदपत्रे बाहेर काढत असल्याचे त्यांनी सांगितले. तर ग्रामपंचायत अधिकारी तराळे यांनी मंगळवारच्या विशेष ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी ती बाहेर पाठविण्यात येत असल्याचे सांगितल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

मंगळवारी ग्रामसभा असताना सुट्टीच्या दिवशी मागील खिडकीतून कागदपत्रे बाहेर नेण्यात आली. या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच खडसंगी येथील क्रीडांगणाच्या कामाची चौकशी प्रशासन कधी करणार? – राजू गेडाम, ग्रामस्थ आंदोलक

आता प्रशासनाच्या चौकशीकडे नजर

खडसंगी ग्रामपंचायतीतील आंदोलन, विशेष ग्रामसभेची तयारी आणि त्यापूर्वी कागदपत्रे बाहेर नेल्याच्या आरोपामुळे गावातील वातावरण तापले आहे. कागदपत्रे झेरॉक्ससाठीच नेण्यात आली होती की या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले, याचा उलगडा चौकशीतूनच होणार आहे. मंगळवारच्च्या विशेष ग्रामसभेपूर्वी प्रशासन याचाबत स्पष्ट भूमिका मांडणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?

मंगळवारी ग्रामसभा असल्याने काही महत्त्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स काढणे आवश्यक होते. माझ्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे मला ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास उशीर होणार होता. त्यामुळे कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी मीच चपराश्याला सांगितले होते. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू असल्याने चपराश्याने भीतीपोटी मागील खिडकीतून कागदपत्रे बाहेर काढली. कागदपत्रे झेरॉक्स काढण्यासाठीच नेण्यात आली होती. यामागे कोणताही गैाकार करण्याचा हेतू नव्हता. – कवडू तरारे, ग्रामपंचायत अधिकारी खडसगी

Web Title: Khadsangi gram panchayat documents taken out through back window inquiry demanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
1

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
2

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
3

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?
4

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.