Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने 'ट्रिगर-१' लागू करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख ७० हजार २७७ हेक्टरवर लागवड करण्यात आली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 27, 2026 | 02:58 PM
Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू

Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू

Follow Us
Follow Us:
  • पावसातील तूट आणि अन्य निकषांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे.
  • दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्ज पुनर्गठन, कर्जवसुलीला स्थगिती आणि कृषिपंपांच्या वीजबिलात सवलत मिळणार आहे.
  • पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, अन्नधान्य आणि रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर: खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य घटकांमुळे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीचा शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांवर परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ नुसार दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार खरीप हंगामातील जूनपासून आतापर्यंतच्या पर्जन्यमानाची तूट आणि अन्य निकषांचा विचार करण्यात आला.

Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू

कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू असल्याचे स्पष्ट झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही आणि पोंभूर्णा या सर्व १२ तालुक्यांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख ७० हजार २७७ हेक्टरवर लागवड करण्यात आली. त्यापैकी मुख्य पीक असलेल्या कापसाची लागवड १ लाख ९३ हजार ९४४ हेक्टर, धान १ लाख ८६ हजार ४२ हेक्टर, सोयाबीन ५३ हजार ९७६ हेक्टरवर लागवड करण्यात आली.  (फोटो सौजन्य – AI Created) 

सर्वाधिक फटका धानपिकाला बसलेला असून दुष्काळी भागांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यासह विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. कृषिपंपांच्या चालू वीजबिलातही सूट देण्यात येणार आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आल्याने त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांना ही सवलत लागू राहणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातही माफी देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक कामे सुरू करण्यासाठी निकष शिथिल करण्यात येणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

चारा, पाणी, अन्नधान्याचे नियोजन

दुष्काळाचा परिणाम शेतकरी व शेतमजुरांच्या उपजीविकेवर होऊ नये, यासाठी अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. जनावरांसाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तसेच जलसंधारणाची कामेही हाती घेतली जाणार आहेत.

जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय

‘दिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांव्या पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पीक परिस्थितीचा सविस्तर अहवाल कृषी आयुक्तामार्फत शासनाला सादर केला जाणार आहे.- वसुमना पंत, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur drought trigger 1 in all 12 talukas farmers to get relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..
1

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे
2

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
3

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
4

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.