Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये इथेनॉल प्रकल्पाच्या दूषित पाण्याचा फटका; ब्रह्मपुरीतील सात गावांत त्वचारोगाचा प्रकोप

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात इथेनॉल प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सात गावांमध्ये त्वचारोगाच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १९८ बाधित नागरिक आढळल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2026 | 03:09 PM
Chandrapur News: चंद्रपूरमध्ये इथेनॉल प्रकल्पाच्या दूषित पाण्याचा फटका; ब्रह्मपुरीतील सात गावांत त्वचारोगाचा प्रकोप

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये इथेनॉल प्रकल्पाच्या दूषित पाण्याचा फटका; ब्रह्मपुरीतील सात गावांत त्वचारोगाचा प्रकोप

Follow Us
Follow Us:
  • इथेनॉल प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील सात गावांतील पाणी दूषित झाल्याचा आरोप आहे.
  • आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात तब्बल १९८ नागरिकांना त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले.
  • दूषित पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौगान: एकीकडे औद्योगिक विकासाचा डांगोरा पिटला जात असताना, दुसरीकडे ब्रह्मपुरी तालुक्यातील एका इथेनॉल प्रकल्पाने सोडलेल्या विषारी अन् दूषित सांडपाण्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा थेट खेळखंडोबा सुरू आहे. या रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाणी व पाण्याचे स्रोत दूषित झाले असून, तब्बल सात गावांमध्ये अंगाला खाज सुटणे, शरीरावर चट्टे आणि पुरळ उठणे यांसारख्या गंभीर त्वचा रोगाचा प्रकोप झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तालुका आरोग्य यंत्रणेने केलेल्या तातडीच्या पाहणीत तब्बल १९८ नागरिक बाधित आढळल्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला.

Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १६ जुलै रोजी पाठवलेल्या शासकीय पत्रात इथेनॉल प्रकल्पाच्या बेजबाबदार आणि प्रदूषणकारी कारभारावर स्पष्ट बोट ठेवले होते. या रासायनिक सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणी प्रचंड दूषित झाले असून, हेच पाणी पिण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे समोर आले होते. या पत्राची तत्काळ दखल घेत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने ब्रह्मपुरी तालुका वैद्यकीय प्रशासनाला संबंधित बाधित गावांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले होते.

जिल्हा आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या तालुका प्रशासनाच्या आरोग्य पथकाने ब्रह्मपुरी परिसरातील सातही बाधित गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष आरोग्य तपासणी व सर्वेक्षण पूर्ण केले. या सर्वेक्षणात लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक ग्रामस्थ गंभीर त्वचा रोगाने ग्रस्त असल्याचे उघडकीस आले आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

दूषित पाण्यामुळेच हा आजार वेगाने पसरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हा सविस्तर तपासणी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या अहवालाने इथेनॉल प्रकल्प व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा पूर्णपणे उघड्यावर आणला असल्याचे नागरिकांचे मत आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकृत अहवालात १९८ रुग्ण आढळल्याचे सिद्ध झाल्यामुळे आता चेंडू जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोर्टात आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणल्याप्रकरणी आणि परिसरातील पाणी विषारी केल्याप्रकरणी संबंधित इथेनॉल प्रकल्प व्यवस्थापनावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल होणार का? प्रभावित सातही गावांना तत्काळ शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन काय ठोस उपाययोजना करणार? आरोग्य विभागाच्या या अहवालानंतर आता वरिष्ठ पातळीवरून या प्रदूषणकारी इथेनॉल प्रकल्पाचे कुलूप ठोकले जाणार की नेहमीप्रमाणे कारवाई कागदावरच राहणार, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Konkan Railway मध्ये प्रवाशांचा ‘गेम’? हक्काच्या सीटवर अनधिकृत प्रवाशांची दादागिरी; TC ढुंकूनही पाहीना

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार इथेनॉल प्रकत्यातून निघणाच्या पाण्यामुळे प्रभावित संभाव्य क्षेत्राची त्वरित दखल घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उदापूर, बोरगाव, झीलबोडी, पारडगाव, परसोडी, पेटवार्ड आणि फुलेनगर या सातही गावांमध्ये आरोग्य विभागामार्फत सखोल सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

या सर्व्हेक्षणामध्ये पेटवार्ड आणि फुलेनगर हे दोन भाग ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्या’च्या कार्यक्षेत्रात येत असून, उर्वरित उदापूर, बोरगाव, झीलबोडी, पारडगाव आणि परसोडी ही पाच गावे प्राथमिक आरोग्य केंद्र, चौगान अंतर्गत येतात, सर्व बाधित व लगतच्या भागातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी प्राधान्याने करण्यात आली आहे. सर्व्हेक्षणाचा सविस्तर अहवाल जिल्हा आरोग्य कार्यालयास सादर करण्यात आला आहे. – डॉ. मंदोधरा सुखदेवे, तालुका वैद्यकीय अधिकारी, ब्रह्मपुरी

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur ethanol plant pollution contaminated water affects 198 people across 7 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
2

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
3

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
4

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.