
Chandrapur News: प्रचार करताना उमदेवारांची दमछाक, १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात
Raigad News: डिजिटल यंत्रणेने वाढवले रुग्णांचं टेंशन, ‘आभा’ अॅपमुळे संतापले नागरिक
जिल्ह्यात १३५१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून, यामध्ये ७६ उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी, तर १२७५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात नशिब आजमावित आहेत. बल्लारपूर नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या उमेदवार अलका वाढई, भाजपाच्या उमेदवार रेणुका दुधे आणि काँग्रेसकडून बंडखोरी करीत शिवसेना उबाठाकडून मैदानात असलेल्या चैताली मुलचंदानी यांच्यात प्रामुख्याने लढत होण्याची शक्यता आहे. तर बसपाच्या पूजा रहीकवार, आपच्या मंजूषा अय्यर, वंचित बहुजन आघडीच्या वंदना तामगाडगे आणि राकाँच्या रोजीदा ताजुद्दीन शेख हे उमेदवार देखील रिंगणात असल्याने बल्लारपुरातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भद्रावती नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार सुनील नामोजवार यांच्यात काट्याची लढत होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी शिवसेना शिंदे गटाचे प्रफुल चटकी, शिवसेना उबाठाचे नरेंद्र पढाल, बसपाचे उमेश काकडे, आम आदमी पक्षाचे विशाल शिंदे मैदानात आहेत. वरोरा नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अर्चना ठाकरे व भाजपच्या माया राजूरकर यांच्यात काट्याची टक्कर होणार असून; मैदानात शिवसेनाशिंदे गटाच्या ज्योती मत्ते, शिवसेना उबाठाच्या सोनम नाशिककर आणि राकाँच्या रंजना पारशिवे आपले नशिब आजमावित आहेत. (फोटो सौजन्य – istockphoto)
ब्रह्मपुरी नगर परिषदेत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे योगेश मिसार, तर भाजपचे सुयोगकुमार बाळबुधे यांच्यात लढत आहे. शिवसेना उबाठाचे मिलिंद भनारे, बसपाचे निहाल ढोरे मैदानात नशिब आजमावित आहेत. मूल नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या एकता समर्थ आणि भाजपच्या प्रा. किरण कापगते यांच्यात काट्याची टक्कर होणार असून, शिवसेनेच्या भारती राखंडे व बसपाच्या चैताली मद्रीवार मैदानात आपले नशिब आजमावित आहेत.
राजूरा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे राधेश्याम अडानीया, तर काँग्रेसचे अरूण धोटे यांच्यात लढत असून शिवसेनेचे राजेंद्र डोहे, राकाँचे आदित्य भाके, वंचित बहुजन आघाडीचे गजानन मस्के रिंगणात लढतीसाठी सज्ज आहेत. घुगुस नगर परिषदेत काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के, भाजपाच्या शारदा दुर्गम, बसपाच्या आरती पाटील, शिवसेना उबाठाच्या नैना ढोके व अपक्ष रिता देशकर, रंजिता आगदारी निवडणूक रिंगणात आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा ४ लाख २१ हजार मतदार वाढले, प्रारूप मतदारयादी जाहीर
गडचांदूर नगर परिषदेत भाजपचे अरविंद डोहे, नगर विकास आघाडीचे उमेदवार निलेश ताजणे आणि काँग्रेसचे उमेदवार सचिन भोयर यांच्यात काट्याची लढत होत असून, राकाँचे शरद जोगी, शिवसेनेचे धनंजय छाजेड, राकाँ शरद पवार गटाचे अरूण निमजे, प्रहारचे अरविंद वाघमारे मैदानात आहेत. नागभीड नगर परिषदेत भाजपचे लोमेश दुधे, काँग्रेसचे स्मिता खापर्डे, राकाँचे आत्माराम खोब्रागडे, बसपाचे मनोज नागदेवते, शिवसेनेचे श्रीकांत खापर्डे यांच्यासह चार अपक्ष उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत. चिमूर नगर परिषदेत काँग्रेसच्या सारीका नंदेश्वर, भाजपाच्या गीता लिंगायत यांच्यात थेट सामना असून वंचित बहुजन आघाडीच्या सुरक्षा अंबादे, राकाँच्या वनिता रंगारी, शिवसेनेच्या आयेशा शेंडे व तीन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.