Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा

चंद्रपूर जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्याने धान रोवणीच्या कामांना वेग आला असला, तरी मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2026 | 02:12 PM
Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा

Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा

Follow Us
Follow Us:
  • सलग तीन दिवसांच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात धान रोवणीच्या कामांना वेग आला आहे.
  • एकाच वेळी रोवणी सुरू झाल्याने अनेक गावांमध्ये शेतमजुरांची टंचाई निर्माण झाली असून मजुरीचे दरही वाढले आहेत.
  • यंदा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 65.3 टक्के पावसाची नोंद झाली असली, तरी अलीकडील पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूर: गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली असून, धान रोवणीच्या कामांनी वेग घेतला आहे. जून महिन्यात पावसाच्या अनियमिततेमुळे पन्हे रोवण्याइतपत होऊनही शेतकऱ्यांना रोवणी करता येत नव्हती. मात्र सलग तीन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात धान रोवणीची लगबग सुरू झाली आहे.

Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी

यंदा पावसाने सुरुवातीला दडी मारल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत होते. काही ठिकाणी रोपवाटिका सुकण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे दुबार पेरणी किंवा रोपे पुन्हा तयार करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र गेल्या तीन दिवसातील पावसामुळे ही चिंता दूर झाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चंद्रपूर, ब्रहापुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, मूल, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा आणि सावली तालुक्यांतील शेतांमध्ये शेतकरी व शेतमजूर सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोवणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी महिलांचा मोठा सहभाग असून, शेतांमध्ये पारंपरिक पद्धतीने धान रोपांची लागवड सुरू झाली आहे. पुढील काही दिवस पावसाची साथ कायम राहिल्यास जिल्ह्यातील धान लागवड मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धान रोवणीसाठी मजूर मिळेना; कामे अपूर्ण

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धान रोवणीच्या कामाला मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी एकाच वेळी रोवणीला सुरुवात केल्याने शेतमजुरांची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये रोवणीसाठी मजूर उपलब्ध होत नसून, शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही ठिकाणी मजुरीचे दरही वाढले असून, मजुरांच्या कमतरतेमुळे रोवणीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

Raigad News: किहीममध्ये संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी दिशा

सरासरीच्या केवळ ६५ टक्के पावसाची नोंद

जिल्ह्यात जून महिन्यापासून ४४८.५ मिमी एवढा सरासरी पाऊस पडला. मात्र यावर्षी २९२.८ मिमी पाऊस पडला. जे सरासरीच्या केवळ ६५.३ टक्के एवढा आहे. तर मागील तीन दिवसामध्ये सरासरी ८४.२ मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे रोवणीला वेग आलेला आहे. सोमवारी २१.६ मिमी, मंगळवारी ४३.५, तर बुधवारी १९.६ मिमी एवढा पाऊस पडला. दरम्यान गुरूवारी पावसाने उसंत दिली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur rains boost paddy transplantation farmers face labour shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
2

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
3

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
4

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.