Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चंद्रपुरातील बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावर रेल्वेची धडक बसून ४ ते ५ वर्षांच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या प्राथमिक अहवालानुसार डोक्याला झालेल्या तीव्र दुखापतीमुळे न्यूरोलॉजिकल शॉक आल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2026 | 02:59 PM
Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर रेल्वेच्या धडकेत ४ ते ५ वर्षांच्या नर बिबट्याचा मृत्यू.
  • रेल्वे मार्गावरील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी.
  • बिबट्याने गोठ्यात शिरून तीन शेळ्या ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
चंद्रपूर: बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे गाडीने आतापर्यंत अनेक वन्यप्राण्यांचा बळी घेतला आहे. यात आणखी एका नर बिबट्याची भर पडली आहे. रेल्वेची धडक बसल्याने नर बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना नियतक्षेत्र मूर्ती येथील कक्ष क्रमांक ५९० मधील बल्लारशाह-काजीपेठ रेल्वेच्या डाउन लाइनवर पोल क्रमांक १५२/२६ जवळ शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. वनविभागाच्या प्राथमिक अहवालानुसार रेल्वेच्या जबर धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या तीव्र आघातामुळे निर्माण झालेल्या न्यूरोलॉजिकल शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Raigad News: पराभवानंतरही ओझर्डेंची सामाजिक बांधिलकी कायम; गणेशभक्तांसाठी पुन्हा मोफत एसटी सेवेची घोषणा

शनिवारी दुपारच्या सुमारास बल्लारशाहा काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक ५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ जवळ बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहीती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत बिबट्याचे वय ४ ते ५ वर्षाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पंचनामा करून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल अद्याप प्राप्त नसल्याची नोंद प्राथमिक कागदपत्रात असली, तरी मृत्यूचे प्राथमिक कारण स्पष्ट करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – pinterest) 

रेल्वेच्या जबर धडकेमुळे बिबट्याच्या डोक्याला झालेल्या तीव्र आघातातून न्यूरोलॉजिकल शॉक निर्माण झाला आणि त्यातून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे. शवविच्छेदनाची नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृत बिबट्याचे शव मध्यवर्ती रोपवाटिका, सुमठाणा येथे नेण्यात आले. वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे रेल्वे मार्गालगतच्या वन्यजीव सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर वन्यप्राण्यांची ये-जा होत असताना अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्यमान प्रतिबंधात्मक यंत्रणा कितपत सक्षम आहे.

कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

वन्यप्राण्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर पंचनामा, शवविच्छेदन आणि मृतदेहाची विल्हेवाट ही प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, भविष्यात याच मार्गावर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय केल्या जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दक्षिण मध्य रेल्वे आणि वनविभागाने बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गांचा संयुक्त अभ्यास करून वन्यजीवांच्या हालचालींचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित करणे आवश्यक आहे. गरजेनुसार सुरक्षित वन्यजीव मार्ग, अंडरपास अथवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विचार करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि वनविभागाने संयुक्तपणे ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.

Exclusive: डोळे लाल भडक अन् महिलांचा पाठलाग…! रेल्वे स्थानकांवर महिला असुरक्षित? गैरवर्तनाचा धक्कादायक व्हिडीओ समोर

आलेसूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ नवरगाव

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवन क्षेत्रातील आलेसूर येथे गावातील नंदू मेश्राम यांच्या गोठ्यात शिरून तीन शेळ्या ठार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे आलेसूर परिसरात दहशत पसरली आहे. नंदू मेश्राम यांच्या घराशेजारी गोठ्यात बिबट्‌याने रात्री प्रवेश करून बांधून असलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. यात ३ शेळ्या जागीच ठार झाल्या. मेश्राम यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आलेसूर गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Leopard killed after being hit by train on ballarshah kazipet railway line in chandrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Leopard
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
1

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
2

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
3

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
4

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.