Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी

नागभीड तालुक्यातील प्रशासनाकडून शासन परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तहसीलदारांकडून ग्रामसभांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 17, 2026 | 02:23 PM
Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी

Chandrapur News: नागभीडमध्ये वनहक्क ग्रामसभांची प्रशासनाविरोधात नाराजी; तहसीलदारांवर कारवाईची केली मागणी

Follow Us
Follow Us:
  • नागभीड तालुक्यातील प्रशासनाकडून शासन परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर
  • तहसीलदारांकडून ग्रामसभांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप
  • ग्रामपंचायतीची कोणतीही अडवणूक करण्यात आलेली नाही. – महेश देशमुख, तहसीलदार, नागभीड
नागभीड: सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना जंगलातील विकासकामे व वनसंवर्धनाची कामे करण्यासाठी शासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिलेल्या असतानाही नागभीड तालुक्यातील प्रशासनाकडून शासन परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीचा ठराव जोडल्याशिवाय कामे मंजूर होणार नाहीत, असे पत्र तहसीलदारांकडून ग्रामसभांना देण्यात आल्याने ग्रामसभांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तहसीलदारांकडून ग्रामसभांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे.

Black Magic Scam: ”दहा वर्षे घरात सुरू होती अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा खेळ!”ज्येष्ठ दाम्पत्याचे ६ कोटींहून अधिक संपत्तीची लुट!

तालुक्यातील बहुतांश गावांना सामूहिक वनहक्क दावे मंजूर झाले आहेत. या अधिकारांच्या माध्यमातून जंगलाचे संरक्षण, संवर्धन, व्यवस्थापन तसेच जंगल परिसरात रोजगारनिर्मितीची कामे करता यावीत, यासाठी शासनाने ३० नोव्हेंबर २०२१ रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार ग्रामसभेला मनरेगाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित करण्यात आले आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नागभीड तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करून जंगलातील आवश्यक कामांचे नियोजन केले जाते. त्यानंतर ग्रामसभेने मंजूर केलेल्या कामांची चिन्हांकित यादी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालय व पंचायत समितीकडे सादर केली जाते.  (फोटो सौजन्य – AI Created) 

परिपत्रकात यंत्रणा निवडण्याचे स्वातंत्र्य ग्रामसभेला देण्यात आले आहे. ग्रामसभेने नियोजित केलेली कामे स्वतः ग्रामसभेमार्फत राबवायची की ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा इतर शासकीय विभागांमार्फत करून घ्यायची, याचा निर्णय ग्रामसभेच्या मान्यतेने कार्यकारी मंडळ घेईल. ग्रामसभेने निश्चित केलेल्या कामांच्या यादीवर ग्रा.पं.ने १५ दिवसाच्या आत ठराव कारावा.

सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभेने ग्रामसभेमध्ये कामांना मंजुरी देऊन ठरावसंहीत ग्रामपंचायतला दिले आहे. तसा ठराव बनवून ग्रामपंचायतने तहसीलदार यांना द्यावे. आणि तसे पत्र काढून तहसीलदार यांनी ग्रामपंचायत कडून ठराव मागावे. परंतु ग्रामसभेच्या कामाची यादी आणि ठराव, ग्रामसभांना परत करणे म्हणजे एक प्रकारची ग्रामसभांची अवहेलना आहे. याची संपूर्ण चौकशी करून तहसीलदारांवर उचित कारवाही करण्यात यावी. – भोजराज नवघडे, समन्व्यक रिवॉईस संस्था

मनरेगा परिपत्रकासाठी ग्रामसभेची ऑनलाईन परवानगी अपलोड करावी लागते. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून परवानगी मागीतली आहे. परवानगी प्राप्त होताच ऑनलाईन अपलोड केल्या जाईल व कामे सुरू केल्या जातील. ग्रामपंचायतीची कोणतीही अडवणूक करण्यात आलेली नाही. – महेश देशमुख, तहसीलदार, नागभीड

Nashik Temple Threat : नाशिकमधील मंदिरांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या; भाविकांनी घाबरू नये, कालामंदीर पुजाऱ्यांचे आवाहन

अन्यथा आंदोलन

या संपूर्ण प्रकरणावर नागभीड तहसीलदारांनी तातडीने तोडगा काढून शासन परिपत्रकानुसार ग्रामसभांच्या अधिकारांचा सन्मान करावा आणि निर्माण झालेला प्रशासकीय अडथळा दूर करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा एकत्र येऊन आंदोलन छेडतील व पुढील आंदोलनाची दिशा निश्वित करतील, असा इशाराही ग्रामसभा प्रतिनिधींनी दिला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Nagbhid forest rights gram sabhas express anger over administrative delays demand action against tehsildar hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप
1

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET
2

Maharashtra CET Exam 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा होणार CET

Jalgaon News: दहा वर्षे झाली, उड्डाणपूल होईना! म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल
3

Jalgaon News: दहा वर्षे झाली, उड्डाणपूल होईना! म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल

Gayatri Mantra: गायत्री मंत्राचा जप करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
4

Gayatri Mantra: गायत्री मंत्राचा जप करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.