Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

पारडी (ठवरे) ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे २०२५ मध्ये पूर्ण झाली. संबंधित अनुदानाची रक्कम ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहे. मात्र अद्याप ही रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2026 | 02:54 PM
Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Follow Us
Follow Us:
  • पारडी (ठवरे) येथील चार लाभार्थ्यांनी २०२५ मध्ये सिंचन विहिरींची कामे पूर्ण करूनही अद्याप अनुदान मिळालेले नाही.
  • ग्रामपंचायतीला अनुदानाचा निधी प्राप्त झाला असला तरी प्रशासकीय आणि आर्थिक मर्यादांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करता आलेली नाही.
  • शिवसेना तालुका प्रमुख गिरीश नवघडे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अनुदानाची रक्कम तातडीने देण्याची मागणी केली आहे.
नागभीड: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मग्रारोहयो) पूर्ण करण्यात आलेल्या वैयक्तिक सिंचन विहिरींचे अनुदान ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाले असतानाही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग झालेली नसल्याने पारडी (ठवरे) येथील चार लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. स्वतःच्या पैशातून विहिरींची कामे पूर्ण केल्यानंतरही अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे.

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

पारडी (ठवरे) ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे २०२५ मध्ये पूर्ण झाली. देवराम काशिनाथ ठवरे, होमदेव गोपाळा मेश्राम, श्यामला तुकाराम भोयर आणि निशिकांत पुरुषोत्तम रणदिवे या चार लाभार्थ्यांनी कामे पूर्ण केल्यानंतर अनुदानाची प्रतीक्षा केली. संबंधित अनुदानाची रक्कम ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत असले तरी लाभार्थ्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. ग्रामपंचायतीवर १६ फेब्रुवारीपासून प्रशासक असल्याने निर्माण झालेल्या प्रशासकीय व आर्थिक अडचणींचा फटका लाभार्थ्यांना बसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत तो पोहोचत नसल्याची स्थिती आहे.

अनुदानासाठी वारंवार पाठपुरावा करूनहीं प्रश्न सुटत नसल्याने लाभार्थ्यांनी शिवसेना तालुका प्रमुख गिरीश नवघडे यांच्याकडे आपली समस्या मांडली. त्यानंतर नवघडे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांसह चंद्रपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सिंचन विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवून रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी त्यांनी केली.

Ganeshotsav 2026 : Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था; 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश

ग्रामपंचायत पारडी (ठवरे) येथे १६ फेब्रुवारीपासून प्रशासक आहे. प्रशासकांना स्वच्छता, पाणीपुरवठा आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याव्यतिरिक्त इतर आर्थिक व्यवहार करण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करता आलेले नाही. पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतरच याबाबत आर्थिक कार्यवाही करता येईल- दिनेश येरणे, ग्रामसेवक, पारडी (ठवरे)

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Nagbhid irrigation well subsidy delay four farmers await payment despite funds reaching gram panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
2

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
3

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
4

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.