Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष, मतदारांच्या भेटीगाठी सुरू

गोंडपिपरी तालुक्यात सध्यास्थितीत तीनही जिल्हा परिषद गटात महिलाचे आरक्षण आहे. तीनही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये महिलासाठी अनुकूल असे आरक्षण पडले. यामुळे पुरुषी उमेदवारांची चांगलीच गोची झाली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 08, 2025 | 03:15 PM
Chandrapur News: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष, मतदारांच्या भेटीगाठी सुरू

Chandrapur News: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष, मतदारांच्या भेटीगाठी सुरू

Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्केच्या वर
  • निवडणूक विभागाच्या भूमिकेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष
  • अपक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण पडले. यानंतर ३ जिल्हा परिषद गट आणि ६ पंचायत समिती गण असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात सर्व पक्षांनी आपापली रणनीती आखली. राजकीय पक्षाकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. जवळपास सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार देखील निश्चित झाले होते. असे असताना मात्र चंद्रपूर जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्केच्या वर गेल्याने निवडणुकीवर गंडांतर आले आणि निवडणूक प्रक्रिया थांबली. यावेळी तीनही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये महिलासाठी अनुकूल असे आरक्षण पडले. यामुळे प्रस्थापित पुरुष राजकीय मंडळीच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या. अशातच आता निवडणूक विभागाच्या समोरील भूमिकेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून पुरुष मंडळींच्या आशा देखील पल्लवी झाल्या आहेत.

Raigad News: रेवस-करंजा रो-रो सेवा पुन्हा चर्चेत! प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग

अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या आहेत. सोबतच पंचायत समितीवर देखील प्रशासकराज आहे. यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. असे असताना काही दिवसापूर्वीच आरक्षण पडले. आता निवडणूक प्रक्रिया लागणार. यामुळे राजकीय पक्षासह अपक्षांनी देखील निवडणुकांसाठी कंबर कसली. जवळपास साऱ्याच पक्षाचे उमेदवार निश्चित होत आले. सत्ताधारी भाजपने देखील आपापले शिलेदार सज्ज केले, तर विरोधी पक्षाने देखील मित्र पक्षांसह ‘एकोपा’ साधत आपली ‘वज्रमूठ’ बांधली. ३ जिल्हा परिषद गट आणि ६ पंचायत समिती गण असलेल्या गोडपिपरी तालुक्यात काँग्रेस आणि भाजपची थेट लढत बघायला मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – गुगल) 

तीनही जिल्हा परिषद गटात महिला आरक्षण

गोंडपिपरी तालुक्यात सध्यास्थितीत तीनही जिल्हा परिषद गटात महिलाचे आरक्षण आहे. यामुळे पुरुषी उमेदवारांची चांगलीच गोची झाली. मात्र निवडणूक प्रक्रिया थांबल्याने तालुक्यातील पुरुषी राजकीय उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. नुकत्याच राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, येत्या काळात जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या निवडणुका लागणार असे बोलले जाते. प्रशासनदेखील तयार असल्याचे सांगितले जाते. मतदार याद्या देखील तयार असल्याचे अधिकारी सांगतात.

सत्ताधारी, विरोधकांसह अपक्षही तयारीत

सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेसने इतर मित्र पक्षांना सोबत घेत ‘एकोपा’ साधला. ‘हम साथ साथ है’ असे म्हणत मित्र पक्षांशी एकजूट साधली. अशातच ५० टक्के आरक्षण मर्यादा पार केल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका थांबविण्यात आल्या. यामुळे संभाव्य उमेदवारांनी देखील उमेदवारांच्या भेटीगाठीचा सिलसिला थांबविल्याचे चित्र गोंडपिपरी तालुक्यात बघावयास मिळत आहे. आरक्षण बदलणार या भीतीपोटी उमेदवारांनी मतदारांना साद घालणे थांबविले आहे.

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणार? चव्हाणांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा

नेत्यांच्या चर्चेला लागला ब्रेक ‘इन्कमिंग’ची

  • करंजी-खराळपेठ गटात सर्वसाधारण महिला आरक्षण आहे.
  • ‘बड्या’ नेत्याच्या कुटुंबातील व्यक्ती गोंडपिपरीत निवडणूक लढणार.
  • मतदारयाद्या प्रकाशित झाल्याचे चित्र.
  • गोंडपिपरीत ‘इन्कमिग’ची चर्चा थांबली आहे.

Web Title: Political parties shift focus to zilla parishad and panchayat samiti elections chandrapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Election News
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत
1

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत

Baramati byelection 2026 : बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; सुनेत्रा पवारांविरोधात ‘इतके’ उमेदवार रिंगणात
2

Baramati byelection 2026 : बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; सुनेत्रा पवारांविरोधात ‘इतके’ उमेदवार रिंगणात

भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
3

भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

Chandrapur News: क्षणात आनंद शोकात! लग्नात नाचताना 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना
4

Chandrapur News: क्षणात आनंद शोकात! लग्नात नाचताना 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.