Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये चारा टंचाईचे संकट? पशुपालकांनी आतापासूनच करा हे नियोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला

चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील हीच परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाहीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे यांनी पशुपालकांना आतापासूनच चारा व्यवस्थापनाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2026 | 02:24 PM
Chandrapur News: चंद्रपूरमध्ये चारा टंचाईचे संकट? पशुपालकांनी आतापासूनच करा हे नियोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये चारा टंचाईचे संकट? पशुपालकांनी आतापासूनच करा हे नियोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला

Follow Us
Follow Us:
  • जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता
  • दुष्काळाच्या काळात हिरवा आणि सुका चारा उपलब्ध करून देणे पशुपालकांसमोरील मोठे आव्हान
  • बुरशी लागलेला अथवा दूषित चारा जनावरांना देऊ नये
चंद्रपूर: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पशुपालकांनी आतापासूनच चारा व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाहीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे यांनी केले आहे. उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर, मुरघास निर्मिती, अझोला संवर्धन आणि शेतीतील पिकांचे अवशेष प्रक्रिया करून वापरण्याच्या माध्यमातून पशुधनाचे संरक्षण करणे शक्य आहे.

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांचा गनिमी कावा, गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा 

दुष्काळाच्या काळात हिरवा आणि सुका चारा उपलब्ध करून देणे हे पशुपालकांसमोरील मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत चाऱ्याचा अपव्यय टाळून जनावरांना योग्य प्रमाणात खाद्य देणे आवश्यक आहे. चाऱ्याची कुट्टी करून जनावरांना दिल्यास साधारण २० ते २५ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. तसेच निकृष्ट दर्जाच्या सुक्या चाऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्यास त्याची पचनीयता आणि पोषणमूल्य वाढविण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – AI Created)

धानाची पेंढी, सोयाबीन कुटार, मक्याचे अवशेष, गव्हाचे काड आणि तुरीचा भुसा यांचा योग्य पद्धतीने वापर करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करता येतो. पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग करण्यावर भर द्यावा, युरिया प्रक्रिया केलेला चारा तयार करताना मात्र पशुवैद्यकीय अधिकारी किंवा पशुपोषण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

बुरशी लागलेला अथवा दूषित चारा जनावरांना देऊ नये. हिरव्या चाऱ्याचा साठा करून ठेवण्यासाठी मुरघास निर्मिती हा प्रभावी पर्याय आहे. हिरव्या मका किंवा ज्वारीची योग्य अवस्थेत कापणी करून बारीक कुट्टी करावी आणि ती खड्यात, सिमेंटच्या टाकीत किंवा विशेष सायलेज बॅगमध्ये हवाबंद पद्धतीने साठवावी. योग्य प्रक्रियेद्वारे तयार केलेला मुरघास साधारण ४५ ते ५० दिवसांत वापरासाठी उपलब्ध होऊ शकतो. दुष्काळाच्या काळात जनावरांना रसाळ चारा देण्यासह दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करा

पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ल्युसनं, बरसीम आणि ओट यांसारख्या चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे. पाणीटंचाई असलेल्या भागांत उपलब्ध पाण्याचा विचार करूनच पिकांची निवड करावी. गावपातळीवर सामूहिक चारा साठवणूक आणि मुरघास निर्मितीचे नियोजन केल्यास टंचाईची तीव्रता कमी करता येईल.

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

अझोलातून मिळणार पूरक पोषण

अझोला ही पाण्यावर वाढणारी प्रथिनयुक्त वनस्पती असून जनावरांच्या पूरक आहारासाठी उपयुक्त आहे. सावलीच्या ठिकाणी योग्य व्यवस्था करून अझोला संवर्धन केल्यास साधारण १५ ते १८ दिवसात त्याची काढणी सुरू करता येते. गाई, म्हशी आणि शेळ्यांच्या आहारात त्याचा पूरक खाद्य म्हणून समावेश करता येतो.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur farmers alerted to possible fodder shortage experts suggest silage and azolla for livestock feed hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी…
1

NEET विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा! खेळण्यातील बंदुकीच्या बटाने डोक्यावर वार; अन् विद्यार्थी…

Jalgaon News: महिलांच्या हाताला बळ, स्वप्नांना नवी भरारी; ‘उमेद’कडून १.८ कोटींचे कर्ज
2

Jalgaon News: महिलांच्या हाताला बळ, स्वप्नांना नवी भरारी; ‘उमेद’कडून १.८ कोटींचे कर्ज

Raigad News: आधी अतिवृष्टी, नंतर पावसाची दडी! माणगावमध्ये भातशेतीला दुहेरी फटका, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
3

Raigad News: आधी अतिवृष्टी, नंतर पावसाची दडी! माणगावमध्ये भातशेतीला दुहेरी फटका, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Gopichand Padalkar: धनगर आरक्षणाच्या पुढील भूमिकेसाठी १५ नोव्हेंबरला पुण्यात महत्त्वाची बैठक
4

Gopichand Padalkar: धनगर आरक्षणाच्या पुढील भूमिकेसाठी १५ नोव्हेंबरला पुण्यात महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.